मालट्रकमध्ये विद्युत करंट उतरला, गाडीचे टायर फुटले; चालकासह हमालाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 01:59 PM2023-03-16T13:59:29+5:302023-03-16T14:00:07+5:30

मध्ये सीटवर बसलेला हमाल पप्पू सोमनाथ यादव याने देखील गाडीतून खाली उडी मारली.

Hamala along with the driver died due to electrocution in the cargo truck | मालट्रकमध्ये विद्युत करंट उतरला, गाडीचे टायर फुटले; चालकासह हमालाचा मृत्यू

मालट्रकमध्ये विद्युत करंट उतरला, गाडीचे टायर फुटले; चालकासह हमालाचा मृत्यू

googlenewsNext

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : निफाड तालुक्यातील दावचवाडी येथे शेतात शेणखत खाली करण्यासाठी गेलेल्या मालट्रकमध्ये विद्युत तारांचा स्पर्श होऊन प्रवाह उतरल्याने चालकासह हमालाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, निफाड तालुक्यातील दावचवाडी येथे गुरुवार, १६ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मुंबई येथील पारसनाथ गणपत पाल हे त्याचेकडील मालट्रक क्र.एम.एच १५ बी.जे ७४८३ यात शेणखत घेऊन पिंपळगाव बसवंत मार्गे दावचवाडी गावात आले. तेथून शेणखत खाली करणारे हमाल पप्पू सोमनाथ यादव व विजय प्रल्हाद शिंदे यांना सदर गाडीमध्ये बसवून पालखेड शिवारातील शेतकरी बाळासाहेब नाना आहेर यांण्या शेतात गाडीतील शेणखत खाली करण्यासाठी दावचवाडी ते पालखेड शिव रस्त्यावर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नेले. त्या ठिकाणी वीजतारा लोंबकळलेल्या होत्या. तेव्हा विजय शिंदे हा मालट्रकचे क्लिनर बाजूने दरवाजात उभा राहून पाहत असताना चालकाने मालट्रक पुढे नेले आणि वरील जिवंत वीज तारेला मालट्रकचे पाठीमागून स्पर्श झाला. त्यावेळी मोठा आवाज होऊन मालट्रकमध्ये वीज प्रवाह उतरल्याने ट्रकचे मागील क्लिनर साईटचे टायर फुटले. हमाल व ड्रायव्हर या दोघांना विजेचा धक्का लागल्याने ते मालट्रकमधून बाहेर फेकले गेले व जमिनीवर खाली पडले. 

मध्ये सीटवर बसलेला हमाल पप्पू सोमनाथ यादव याने देखील गाडीतून खाली उडी मारली. मात्र तोपर्यंत विद्युत सप्लाय बंद झाल्याने त्यास विजेचा धक्का लागला नाही. मात्र, मालट्रक मालक ड्रायव्हर पारसनाथ गणपत पाल (वय ६३ वर्षे, रा. घर नं. ६३०, शिवशक्ती नगर, ठाणे-बेलापुर रोड, तुर्भे स्टोर, नवी मुंबई, तुर्भे, ठाणे महाराष्ट्र व हमाल- विजय प्रल्हाद शिंदे, वय- ३९ वर्षे, मूळ राहणार- सोनुन, ता.चोंढी जि. अकोला हल्ली राहणार- दावचवाडी ता. निफाड जि. नाशिक या दोघांना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पिंपळगाव प्राथमिक रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहायक निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहे.

Web Title: Hamala along with the driver died due to electrocution in the cargo truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.