चांदवडला अतिक्रमणांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 09:40 PM2020-06-02T21:40:26+5:302020-06-03T00:14:23+5:30
चांदवड : येथील पेट्रोलपंप चौफुलीपासून दुर्तफा असलेल्या अतिक्रमित टपऱ्यांवर नगर परिषदेने बुलडोझर फिरविला. अचानक झालेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
चांदवड : येथील पेट्रोलपंप चौफुलीपासून दुर्तफा असलेल्या अतिक्रमित टपऱ्यांवर नगर परिषदेने बुलडोझर फिरविला. अचानक झालेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
ओझरखेड ४४ गाव योजनेचे काम करताना पाईपलाईन टाकण्यासाठी येणारी अडचण लक्षात घेता सदरचे अतिक्रमण मनमाड रोडपर्यंत दुर्तफा असून ते पूर्णपणे काढले जाईल असे मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी सांगितले होते. यापूर्वी या अतिक्रमणधारकांना वारंवार नोटिसा दिल्या आहेत. त्यांंनी स्व:ताहुन अतिक्रमण काढणे गरजेचे होते असे सांगण्यात आले. येत्या दोन दिवसात ही अतिक्रमण हटाव मोहीम पूर्ण केली जाईल तरी टपरीधारकांनी स्व:ताहून आपल्या टपºया, दुकाने काढून घ्यावी, अन्यथा चांदवड नगर परिषद ही कार्यवाही करणार आहे. दरम्यान लॉकडाउन व कोरोना संसर्गाच्या काळात ही कार्यवाही करावयास नको होती, असे टपरीधारकांचे म्हणणे आहे. मात्र चांदवड शहराला पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी आधीच उशीर झाला असून ते काम लवकर पूर्णत्वास जावे यासाठी ही कार्यवाही करीत असल्याचे नगर परिेषद प्रशासनाने सांगितले. यावेळी मुख्याधिकारी अभिजीत कदम, शेषराव चौधरी उपस्थित होते.
------------------------
चांदवड पेट्रोलपंप चौफुली, कृषी उत्पन्न बाजार समिती, वनविभाग कार्यालय, बसस्थानकासमोरील दोन्ही बाजू, थेट आठवड ेबाजार ते मनमाड चौफुलीपर्यंत ज्या -ज्या अतिक्रमित टपºया आहेत त्या काढल्या जातील, असे नगर परिषद प्रशासनाने सांगितले आहे.