हातभट्टीवर धाड
By admin | Published: June 16, 2017 12:40 AM2017-06-16T00:40:39+5:302017-06-16T00:43:32+5:30
हातभट्टीवर धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
घोटी : इगतपुरी तालुक्यात दुर्गम, डोंगराळ भागात निर्जनस्थळी गेली काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गावठी दारूनिर्मिती करणाऱ्या हातभट्ट्यावर आज पहाटे घोटी पोलिसांनी कारवाई करीत हातभट्टी नष्ट केली. या कारवाईत पोलिसांनी दारू निर्मितीसाठी लागणारे साडेतीन हजार लिटर रसायन, कच्चे
साहित्य असा दोन लाख रुपये किमतीचे साहित्य नष्ट केले. पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.
घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत निरपण परिसरातील डोंगरावर एका निर्जनस्थळी गावठी दारूनिर्मितीची हातभट्टी असल्याची गुप्त माहिती घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना मिळाली होती.
या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, हवालदार सुहास गोसावी, श्रीकांत देशमुख, गांगोडे आदींच्या पथकाने आज पहाटे या भागात पायपीट करीत निर्जनस्थळी सुरू असलेली हातभट्टी उद्ध्वस्त केली. दरम्यान, पोलीस आल्याची कुणकुण भट्टीचालकांना लागल्याने त्याने पलायन केले.