अनधिकृत बांधकामांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 01:07 AM2018-03-03T01:07:03+5:302018-03-03T01:07:03+5:30

महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी शहरातील रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केलेली असतानाच, वर्दळीचे आणि विकास योजनेअंतर्गत येणाºया रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांविरोधीही मोहिमेची तयारी चालविली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली जाण्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत.

Hammer on unauthorized construction | अनधिकृत बांधकामांवर हातोडा

अनधिकृत बांधकामांवर हातोडा

Next

नाशिक : महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी शहरातील रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केलेली असतानाच, वर्दळीचे आणि विकास योजनेअंतर्गत येणाºया रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांविरोधीही मोहिमेची तयारी चालविली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली जाण्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत. सहाही विभागीय कार्यालयां- मार्फत गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रस्त्यांवर अनधिकृतपणे व्यवसाय थाटणाºया हॉकर्स, विक्रेत्यांविरुद्ध जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे. त्यातून विक्रेत्यांनी केलेली पक्की बांधकामे, शेड््स हटवतानाच त्यांचे साहित्यही जप्त केले जात आहे. त्यामुळे प्रमुख बाजारपेठेतील अनेक रस्ते मोकळे होण्यास मदत होत आहे. महापालिकेमार्फत ही मोहीम सुरू असतानाच मंजूर रस्त्यांलगत, सामासिक अंतरात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवरही हातोडा चालविण्याची तयारी आरंभली आहे. त्यानुसार, नगररचना विभागाकडील प्रलंबित प्रकरणे तपासून तत्काळ अतिक्रमण विभागाकडे रवाना करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याचे समजते.
गुन्हे दाखल करण्याचा इशारा
नागरिक, व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकामे स्वत:हून तत्काळ काढून घ्यावीत अन्यथा मनपामार्फत कोणत्याही क्षणी पूर्वसूचना न देता सदरची अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यात येतील व अतिक्र मणे हटविण्यासाठी येणारा संपूर्ण खर्च हा संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे. याशिवाय, महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमानुसार संबंधितांविरु द्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Hammer on unauthorized construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.