जोरण ग्रामपंचायतीवर संतप्त महिलांचा हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 02:07 PM2019-04-27T14:07:33+5:302019-04-27T14:07:46+5:30
जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथे गावात पिण्याचा पाणी प्रश्न निर्माण झाला असून नळांना पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.
जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथे गावात पिण्याचा पाणी प्रश्न निर्माण झाला असून नळांना पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.
येथील नळांवर काही काळ प्रतिक्षा करून हंडाभर पाणी पाहण्यास मिळते. जोरणला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठले असून विहिरीत पाणी कमी आहे. त्यामुळे नळांना पाणी कमी येत असल्यामुळे महिला वर्गाने थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले व सरपंच, उपसरपंच यांना घेराव घातला. गावात पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर व कुठल्याही प्रकारे उपाय योजना केल्या नसल्याचा आरोप यावेळी जोरण येथिल महिलांनी केला. दरवर्षी जोरण गावात भीषन पाणी टंचाई भासत असते मात्र दरवर्षी ग्रामपंचायत प्रश्नावरती अपयशी ठरते ग्रामपंचायतीचा ठिसाळ कारभार मात्र ग्रामस्थांना विनाकारण त्रास सोसावा लागत आहे पाणी टंचाई भासत असते. ऐन उन्हाळ्यात ग्रामपंचायतीने पाण्याची कुठल्याही प्रकारे व्यवस्था केली नसल्याचा आरोप महिलांनी केला.
विहिरीत पाणी असते परंतु पिण्याच्या पाण्याकडे ग्रामपंचायत लक्ष देत नाही व तसेच आज नळांना पाणी कमी येत आहे. महिलावर्गाने हंडा मोर्चा काढूनही जर दोन,तीन दिवसात पिण्याचा पाणी प्रश्न नाही सोडवला तर जोरण ग्रामपंचातीस कुलुप लावण्यात येईल असा इशारा महिला वर्गाने दिला.
यावेळी संगिता निकम, शकुंतला देसले, छाया सावकार, चित्रा सावकार, सुरेखा सावकार, भारती सावकार, जयवंता बागुल, मंगलबाई जगताप, विमलबाई हिरे, एकनाथ निकम, भाऊसाहेब सावकार, निंबा देवरे, मुरलीधर सावकार, कडू सावकार, शांताराम सावकार आदी उपस्थित होते.