प्राणघातक हल्ला करणाऱ्या सराईत गुंडाला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 12:38 AM2021-02-18T00:38:53+5:302021-02-18T00:39:12+5:30
नाशिक : प्राणघातक हल्ल्यासह वेगवेगळ्या पंधरा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला व मुंबईनाका पोलिसांसह अन्य पोलिसांना हवा असलेल्या फरार सराईत गुंडाला सातपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या.

नीलेश विनायक कोळेकर (३१, रा. शिवाजीनगर) असे सराईत गुंडाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे शोध पथकाचे दोन तपासी पथके सातपूर पोलीस ठाणे हद्दीत गस्तीवर होती. कार्बन नाका-एबीबी सर्कल रस्त्यावर गस्त घालत असताना मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास येथील म्हसोबा महाराज मंदिराजवळ एक व्यक्ती संशयास्पदरीत्या उभी असल्याचे पथकाच्या लक्षात आले. यावेळी पोलिसांनी शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्याची विचारपूस करण्यास सुरुवात केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. कोळेकर हा २०१६ साली मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे. त्यास अटक करत पोलिसांनी पुढील तपासाकरिता मुंबईनाका पोलिसांच्या हवाली केले आहे.