दारणा धरणाशी असलेल्या हातभट्ट्या ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांकडून उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 04:45 PM2020-04-18T16:45:51+5:302020-04-18T16:47:43+5:30

नांदूरवैद्य : सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच प्रकारची दारूविक्र ी बंद असतांना इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णानगर कातोरेवाडी येथील पोलिस पाटील मनोहर जाधव तसेच काही ग्रामस्थांच्या मदतीने दारणा धरणाच्या पाण्यामध्ये असलेला बेकायदा गावठी दारु चा अड्डा वाडिव-हे पोलिसांनी उध्वस्त केला आहे.

The handcuffs belonging to the Darna dam were destroyed by the police with the help of villagers | दारणा धरणाशी असलेल्या हातभट्ट्या ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांकडून उध्वस्त

दारणा धरणाशी असलेल्या हातभट्ट्या ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांकडून उध्वस्त

Next
ठळक मुद्देगावठी दारु ची भट्टी चालविणा-या अज्ञात व्यक्तींचा पोलिस शोध घेत आहेत.

नांदूरवैद्य : सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच प्रकारची दारूविक्र ी बंद असतांना इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णानगर कातोरेवाडी येथील पोलिस पाटील मनोहर जाधव तसेच काही ग्रामस्थांच्या मदतीने दारणा धरणाच्या पाण्यामध्ये असलेला बेकायदा गावठी दारु चा अड्डा वाडिव-हे पोलिसांनी उध्वस्त केला आहे.
इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगर कातोरेवाडी येथील हातभट्टी वाडिव-हे पोलिसांनी उध्वस्त केली आहे. बेकायदा दारु तयार करण्याचा अड्डा नेस्तनाबूत करण्यात आला. वाडिव-हे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्विजत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामिगरी केली.
इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगर कातोरेवाडी हा दारणा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या परिसरात बेकायदा गावठी दारु तयार करण्याचा अड्डा असल्याची गुप्त माहिती वाडिव-हे पोलिसांना मिळाली. याबाबत पोलिसांनी येथील पोलिस पाटील मनोहर जाधव व काही ग्रामस्थांची मदत घेऊन नदीच्या पार असलेल्या अड्ड्यावर छापा मारला.
या छाप्यात गावठी दारु बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. बेकायदा गावठी दारु ची भट्टी चालविणा-या अज्ञात व्यक्तींचा पोलिस शोध घेत आहेत. या कामिगरीत वाडिव-हे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्विजत जाधव बीट अमंलदार वाजे तसेच इतर पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.
 
Web Title: The handcuffs belonging to the Darna dam were destroyed by the police with the help of villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.