वाढदिवसाच्या दिवशीच हातात पडल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 01:48 AM2022-06-06T01:48:40+5:302022-06-06T01:49:02+5:30

वाढदिवसानिमित्त केक चक्क तलवारीने कापण्याची तयारी करीत त्यासाठी तलवार आणणे तिघा संशयितांना चांगलेच भोवले. वाढदिवसाच्या दिवशीच हाती पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तसेच अंगझडतीत तलवारही जप्त केली. पाथर्डी फाटा परिसरात गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. इंदिरानगर पोलिस ठाण्यात शस्त्र बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Handcuffs on birthdays | वाढदिवसाच्या दिवशीच हातात पडल्या बेड्या

वाढदिवसाच्या दिवशीच हातात पडल्या बेड्या

Next
ठळक मुद्देपाथर्डी फाटा : तलवारीने केक कापण्याची तयारी भोवली

इंदिरानगर : वाढदिवसानिमित्त केक चक्क तलवारीने कापण्याची तयारी करीत त्यासाठी तलवार आणणे तिघा संशयितांना चांगलेच भोवले. वाढदिवसाच्या दिवशीच हाती पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तसेच अंगझडतीत तलवारही जप्त केली. पाथर्डी फाटा परिसरात गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. इंदिरानगर पोलिस ठाण्यात शस्त्र बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि. ४) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गुन्हे शोध पथकाचे सागर परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार काही तरुण तलवार घेऊन पाथर्डी फाट्यावर वाढदिवसाचा केक कापण्यासाठी येणार असल्याचे समजले. त्यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांना माहिती कळविली. त्यांच्या आदेशान्वये त्वरित गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे, लक्ष्मण बोराडे, जावेद खान, सागर परदेशी, मुश्रीफ शेख यांच्या पथकाने पाथर्डी फाटा येथील एका हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत सापळा रचला. या ठिकाणी तीन संशयित तरुण उभे असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, सागर जाधव (२३, रा. इंदिरानगर, घोटी), विकास घोटे (२२, रा. जाधव वाडी, रायगडनगर), उमेश बोंडे (रा. टिटोली, ता. इगतपुरी), असे त्यांनी नावे सांगितली. त्यांची झडती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांना सहकार्य केले नाही. त्यांच्या संशयास्पद हालचालींवरून संशय बळावला. पोलिसांनी खाक्या दाखवत अंगझडती घेतली असता, संशयित सागर जाधव याने पॅन्टच्या आतमध्ये उजव्या बाजूस कमरेजवळ घातक लोखंडी तलवार ठेवलेली आढळून आली. पोलिसांनी तलवार जप्त करत तिघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याविरुद्ध शस्त्र बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Handcuffs on birthdays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.