दहशत पसरविणाऱ्या दोघा गुंडांना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 08:34 PM2021-02-08T20:34:35+5:302021-02-09T00:30:31+5:30

ओझरटाऊनशिप : ओझर येथे चांदणी चौक, राजवाडा परिसरात हातात हत्यार घेवुन आरडाओरडा करून रहिवाशामध्ये दहशत पसरविणाऱ्या दोघा गुंडाना ओझर पोलीस गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

Handcuffs to two thugs who spread terror | दहशत पसरविणाऱ्या दोघा गुंडांना ठोकल्या बेड्या

दहशत पसरविणाऱ्या दोघा गुंडांना ठोकल्या बेड्या

Next
ठळक मुद्देसापळा रचून रविवारी रात्री शिताफीने अटक

ओझरटाऊनशिप : ओझर येथे चांदणी चौक, राजवाडा परिसरात हातात हत्यार घेवुन आरडाओरडा करून रहिवाशामध्ये दहशत पसरविणाऱ्या दोघा गुंडाना ओझर पोलीस गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

भव उर्फ दादाराव त्रिभुवन व आदेश उर्फ गोट्या निकम (दोघे ही राहणार मिलींद नगर, ओझर) असे संशयितांची नावे आहेत. हे दोघे संशयित ओझर परिसरातील चांदनी चौक, मल्हार चौक व कोळवाडा परिसरात हातात धारदार शस्र घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाचे अनुपम जाधव यांना मिळाली.

त्यांनी ही माहिती त्वरीत पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांना कळवली. त्यानंतर ओझर गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक युवराज अहिरे, सहाय्यक पोलीस पोलिस उपनिरीक्षक बी. आर. बैरागी, हवालदार बापू आहेर, पोलिस नाईक धारबळे, पोलिस नाईक चौगुले, अहिरराव, पोलिस शिपाई अनुपम जाधव, पोलिस शिपाई अमोल सूर्यवंशी, पोलिस शिपाई हेगडे यांनी सापळा रचून रविवारी (दि.७) रात्री शिताफीने अटक केली.

पोलीस शिपाई अनुपम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादी वरून त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड हे करीत आहेत.

Web Title: Handcuffs to two thugs who spread terror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.