संतप्त महिलांचा हंडामोर्चा पंचवटी : पिण्याच्या पाण्याची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 01:11 AM2018-04-08T01:11:47+5:302018-04-08T01:11:47+5:30

पंचवटी : आडगाव शिवारातील मनपा प्रभाग क्रमांक २ मध्ये गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण.

Handicap Panchavati: Drinking water shortage | संतप्त महिलांचा हंडामोर्चा पंचवटी : पिण्याच्या पाण्याची टंचाई

संतप्त महिलांचा हंडामोर्चा पंचवटी : पिण्याच्या पाण्याची टंचाई

Next
ठळक मुद्देविभागीय कार्यालयाच्या पायरीवर बसून आंदोलन केलेपिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे

पंचवटी : आडगाव शिवारातील मनपा प्रभाग क्रमांक २ मध्ये गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने भाजपा महिला नगरसेवक व परिसरातील संतप्त महिलांनी शनिवारी (दि.७) दुपारी पंचवटी विभागीय कार्यालयावर हंडामोर्चा काढत विभागीय कार्यालयाच्या पायरीवर बसून आंदोलन केले आहे. प्रभाग क्रमांक २ मधील शरयू पार्क, गणेश मार्केट, तसेच कोणार्कनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अल्पवेळ पाणीपुरवठा होत असल्याने उन्हाळ्याच्या प्रारंभीपासूनच नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शनिवारी दुपारी परिसरातील महिलांनी नगरसेवक शीतल माळोदे यांचे कार्यालय गाठून तक्र ार केली त्यानंतर माळोदे यांनी स्वत: महिलांसह पंचवटी विभागीय कार्यालयावर हंडामोर्चा काढून पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन केले आहे.

Web Title: Handicap Panchavati: Drinking water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी