जिल्हा रुग्णालयाच्या दारात रुग्णाची हेळसांड

By Admin | Published: August 19, 2014 12:08 AM2014-08-19T00:08:47+5:302014-08-19T01:25:01+5:30

जिल्हा रुग्णालयाच्या दारात रुग्णाची हेळसांड

Handicap of the patient on the doorstep of the District Hospital | जिल्हा रुग्णालयाच्या दारात रुग्णाची हेळसांड

जिल्हा रुग्णालयाच्या दारात रुग्णाची हेळसांड

googlenewsNext

नाशिक : फीट आलेला रुग्ण दहा मिनिटे जिल्हा रुग्णालयाच्या दारात तळमळत पडूनही त्याला वेळेवर उपचार मिळाले नसल्याचा प्रकार आज सायंकाळी घडला़ या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी, तसेच अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडले़
वेळ सायंकाळी पाचची. सतत येणाऱ्या फीटने त्रस्त रुग्ण जिल्हा रुग्णालयात येतो़ चौकशी कक्षाजवळ जाऊन रुग्णालयात दाखल करून घेण्याची विनंती करतो़ परंतु डॉक्टर नसल्याचे सांगून त्याला हाकलून दिले जाते़ बाहेर पडत असतानाच त्याला फीट येते आणि रुग्णालयाच्या दरवाजातच तो कोसळतो़ तोंडाला फेस आणि हातपाय झाडत रुग्ण सुमारे दहा मिनिटे तेथेच तळमळत पडून असतो. त्याला पाहूनही तेथे उपस्थित आरोग्य सेवक, सुरक्षारक्षक त्याला काहीच मदत तर करत नाहीतच उलट हा नाटक करत असल्याचा टोमणा एकजण
मारतो़ सुमारे दहा मिनिटे सर्वजण बघ्याची भूमिका घेतात़
इतक्यात एका वृत्तपत्राचा छायाचित्रकार हा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात टिपतो़ हे पाहताच मग मात्र संपूर्ण यंत्रणा तत्काळ हलते आणि स्ट्रेचर आणून त्याला उचलून रुग्णालयात दाखल केले जाते़ हा प्रकार येथेच संपत नाही़

सुमारे अर्ध्या तासाने सदर रुग्णाचे फीट जाताच तो बऱ्यापैकी बोलू लागतो व उठून बसतो़ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची कागदपत्रे, केस पेपरवर पोलिसांकडे नोंद व सह्या घेण्यासाठी त्याच रुग्णाला पाठवले जाते़ त्यास चक्कर येत असताना, अनेक कर्मचारी केवळ गप्पा मारत बसले असतानाही रुग्णालाच कागदपत्रांची पूर्तता करण्यास लावले जाते़ असा अजब कारभार जिल्हा रुग्णालयात सुरू असून, त्याचा परिणाम अधिकाऱ्यांवर होत नसल्याचेही वास्तव आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Handicap of the patient on the doorstep of the District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.