आदिवासी महिलांनी भरवले हस्तकला प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 01:58 PM2020-02-01T13:58:49+5:302020-02-01T13:59:03+5:30
पेठ - ग्रामीण व आदिवासी महिलांच्या पारंपारिक गुणकौशल्यांना चालना देत त्यापासून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पेठ तालुक्यातील गोळसपाडा या अतिदुर्गम गावातील शिक्षकांच्या मदतीने महिलांनी भरवलेल्या हस्तकला प्रदर्शनात विविध कलांचे सादरीकरण करण्यात आले.
पेठ - ग्रामीण व आदिवासी महिलांच्या पारंपारिक गुणकौशल्यांना चालना देत त्यापासून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पेठ तालुक्यातील गोळसपाडा या अतिदुर्गम गावातील शिक्षकांच्या मदतीने महिलांनी भरवलेल्या हस्तकला प्रदर्शनात विविध कलांचे सादरीकरण करण्यात आले.
पेठ तालुक्यातील गोळसपाडा येथे कुंभाळे केंद्राच्या केंद्र स्तरीय शिक्षण परिषद चे आयोजन करण्यात आले. येथील शिक्षक विष्णू सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून गावातील महिलांनी बांबू व गवतापासून हाताने तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले. शालेय विद्यार्थी व उपस्थित शिक्षकांना या वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
दुपार सत्रात परिषदेत विध्यार्थी अध्यापनाच्या विविध तंत्राची चर्चा करण्यात आली. विस्तार अधिकारी प्रशांत जाधव यांनी गोळसपाडा शाळेतील विविध शालेय उपक्र माचे निरीक्षण करून कौतुक केले.केंद्रप्रमुख मोतीराम सहारे यांनी प्रशासकिय आढावा घेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवाहन केले. याप्रसंगी विस्तार अधिकारी प्रशांत जाधव, केंद्र प्रमूख मोतीराम सहारे, कुंभाळे केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.शिक्षण परिषद यशस्वीतेसाठी जनार्धन लोहार, सवळीराम पेडर, सुहास कोळेकर यांनी प्रयत्न केले.विष्णू सुर्यवंशी यांनी सुत्रसंचलन व आभार मानले.
--------------------------------------
गोळसपाडा हे अतिदुर्गम असले तरी कलाकारांचे गाव आहे. योग्य मार्गदर्शन व व्यासपिठ मिळाले तर या गावात बांबू व गवतापासून तयार होणार्या विविध हस्तकला निर्माण होऊ शकतात. आदिवासी महिलांना प्रोत्साहन मिळावे तसेच शाळेतील बालकांनाही या कलेची माहीती व्हावी यासाठी सदरचे प्रदर्शन भरवण्यात आले.
-विष्णू सुर्यवंशी , शिक्षक गोळसपाडा