गणेश मंडळाकडून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:49 AM2019-09-01T00:49:00+5:302019-09-01T00:49:20+5:30

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान होऊन बेघर झालेल्या पूरग्रस्तांना सेवाकुंज येथील आई सप्तशृंगी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळाच्या वतीने २१ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश देऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

 Hands of help from Ganesh Mandal | गणेश मंडळाकडून मदतीचा हात

गणेश मंडळाकडून मदतीचा हात

Next

पंचवटी : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान होऊन बेघर झालेल्या पूरग्रस्तांना सेवाकुंज येथील आई सप्तशृंगी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळाच्या वतीने २१ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश देऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
यंदाच्या गणेशोत्सवातील अवाजवी खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून काही दिवसांपूर्वी पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी २१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे प्रदान करण्यात आला.
मंडळाकडून दरवर्षी किमान २० फूट बाय २०फूट आकारात मंडप उभारणी केली जाते. मात्र यंदा वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी मंडप आकार कमी करून १६ बाय २० आकाराची मंडप उभारणी केली आहे. तसेच अवाजवी खर्चाला फाटा देण्यासाठी मंडळातर्फे गणेश स्थापना मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कार्यक्र माला येणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख पाहुण्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ यावर होणाºया खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वागत खर्चाला फाटा देण्यात आला आहे. यंदा मंडळाने गणेशोत्सव कालावधीत घेतले जाणारे मोठे सांस्कृतिक कार्यक्र म रद्द केले आहेत. याशिवाय विद्युत रोषणाईवर होणार खर्चदेखील कमी केला आहे.
बालाजी फाऊंडेशन
नाशिकरोड येथील रेजिमेंटल प्लाझा येथील बालाजी सोशल फाऊंडेशनने मंडपाचा आकार छोटा केला आहे. तसेच जास्त खर्च न करता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दीड लाख रुपये लवकरच जमा करणार आहे.
यंदा मोठ्या प्रमाणात झालेली पर्जन्यवृष्टी व महापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर येथील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माणुसकीच्या नात्याने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बालाजी सोशल फाऊंडेशनच्या वतीने यंदा जादा बडेजाव न करता छोट्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव वर्गणी व मंडळाकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दीड लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच मदतीचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार आहे.
एकनिष्ठ फाउंडेशनचा उपक्रम
सिडको येथील एकनिष्ठ युवा फाउंडेशन यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणार असून, देणगीतून आलेल्या रकमेतून पूरग्रस्तांना मदत करण्याचे मंडळाच्या पदाधिकाºयाकंडून सांगण्यात येत आहे. फाउंडेशन कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. मराठी तरुणांना व्यावसायिक, उद्योजक बनवण्यासाठी प्रोत्साहन देऊन प्रेरित करणे, व्याख्याने, रोजगार मेळावे व अशा प्रकारच्या उपक्र मांची आखणी व अंमलबजावणी करणे. हा या फाउंडेशनचा उद्देश आहे. मंडळाची यावर्षीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये संस्थापक-अध्यक्ष योगेश गांगुर्डे, उपाध्यक्ष अमोल कदम, सचिव योगेश आहिरे, खजिनदार गिरीश पगारे, संयोजक सुजित देशमुख, उपसचिव तुषार पवार, सल्लागार सचिन गांगुर्डे, कार्याध्यक्ष अविनाश सूर्यवंशी, सहचिटणीस शेखर पाटील, चिटणीस मनोज साळवे, सहसचिव अमोल धोंडगे, प्रवक्ता राजीव घोडेराव यांची निवड करण्यात आली.

Web Title:  Hands of help from Ganesh Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.