पूरग्रस्तांसाठी सरसावले सातपूरकरांचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:14 AM2021-07-30T04:14:52+5:302021-07-30T04:14:52+5:30

पूरग्रस्तांना मदत देण्याचे आवाहन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी केल्यानंतर सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील लहान-मोठ्या उद्योगांनी भरघोस मदत दिली ...

Hands of Satpurkars for flood victims | पूरग्रस्तांसाठी सरसावले सातपूरकरांचे हात

पूरग्रस्तांसाठी सरसावले सातपूरकरांचे हात

googlenewsNext

पूरग्रस्तांना मदत देण्याचे आवाहन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी केल्यानंतर सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील लहान-मोठ्या उद्योगांनी भरघोस मदत दिली आहे. आयमा पदाधिकाऱ्यांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. मदत घेऊन पहिला ट्रक महाड येथे रवाना झाला आहे. सातपूर विभागातील मनसे नगरसेवक सलीम शेख यांनी पूरग्रस्तांसाठी ५०० ब्लँकेट आणि जीवनावश्यक वस्तू व महिनाभराचे मानधन देण्याबरोबरच कार्यकर्त्यांकडूनही मदतीचे आवाहन केले आहे. प्रभाग सभापती योगेश शेवरे यांनीही मानधनासह मदत दिली आहे. मनसे महिला विभागप्रमुख आरती खिराडकर, उपाध्यक्ष सचिन सिन्हा यांनीही प्रत्येकी १०० ब्लँकेट आणि अन्य मदत मनसेच्या राजगड कार्यालयात सुपुर्द केली आहे. युवा फाउंडेशनच्या माध्यमातून अध्यक्ष अमोल पाटील आणि नगरसेवक दिनकर पाटील यांनी कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी पाण्याच्या बाटल्या, कोरडा शिधा आणि सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची पाकिटे तयार करून स्वतंत्र वाहनाने थेट पूरग्रस्तांकडे पोहोचती केली आहेत. तर छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर भागातील हालोंडी, शिरोली, रुई, चंदूर आदींसह पूरग्रस्त भागात जाऊन प्रत्येक गावात तेल, तूरडाळ, पोहे, रवा, ज्वारी, गहू, तांदूळ, कोलगेट, साबण, पार्ले बिस्किटे, शेंगदाणे, साखर, चहा पावडर असे दहा दिवस पुरेल एवढे किराणा धान्य किट प्रत्येक गावात १०० किट प्रमाणे सुपुर्द केली. यासह अन्य सामाजिक संस्थांनीदेखील मदतीचा हात दिला आहे.

Web Title: Hands of Satpurkars for flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.