ओझर येथे हनुमान जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:37 PM2018-03-31T12:37:53+5:302018-03-31T12:37:53+5:30
ओझर : रामभक्त हनुमान की जय,पवनसुत हनुमानजी की जय ,जय बजरंग अशा विविध घोषणांनी ओझरची पहाट उजडली निमित्त होते हनुमान जयंतीचे.
ओझर : रामभक्त हनुमान की जय,पवनसुत हनुमानजी की जय ,जय बजरंग अशा विविध घोषणांनी ओझरची पहाट उजडली निमित्त होते हनुमान जयंतीचे. मारूती वेस येथे असलेल्या प्रसिद्ध हनुमान मंदिरात पहाटे तीन वाजता अभिषेकाला प्रारंभ झाला.अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात झालेल्या उत्सवाचे मानकरी पोपटराव बर्डे होते.पौरोहित्य पंकज पुराणिक यांनी केले.यानंतर फटाक्यांच्या अतिषबाजीत सूर्योदयच्या वेळेस जन्मोत्सव संपन्न झाला.यावेळी भाविकांनी सामूहिक फुलांचा वर्षाव केला.सकाळी आठ वाजता मूर्तीची ग्राम प्रदक्षिणा झाली.यावेळी गावातील गल्लोगल्ली महिलांनी सडा मारून रांगोळी काढली होती. सर्वात पुढे तुळस डोक्यावर घेतलेल्या महिला त्यानंतर भजनी मंडळ व मागे हनुमंतरायांची मूर्ती ठेवण्यात आली होती.यावेळी मोठ्या मूर्तीचा डोक्यावरील चांदीचा मुकुट सर्वांचे आकर्षण ठरला.सकाळ पासून सुरू झालेली भाविकांची गर्दी दुपारपर्यंत कायम होती.गावातील इतर मंदिरांत देखील भाविकांनी दर्शन घेतले.यावेळी संजय आहेर, भारत रासने ,दशरथ शिवले, प्रवीण वाघ, पांडुरंग आहेर, भिकाजी रास्कर, रमेश शिंद,े रु पेश क्षीरसागर, प्रभाकर निकुंभ, दौलत पोटे, श्रावण पोट,े राहुल जंजाळे, रमेश थोरात, अरु ण पगार, सुयोग आहेर ,तुषार आहेर राहुल आहेर ,कृष्णा आहेर ,सुनील कोठावदे, दौलत देवकर, ज्ञानेश्वर शिवले, शंकर शिवले ,पुष्पा अक्कर, रत्ना अक्कर, निर्मला अहिरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ,महिला व भजनी मंडळ उपस्थित होते.