कोरोना संसर्गाने हिरावला विद्यार्थ्यांचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 10:47 PM2020-09-07T22:47:24+5:302020-09-08T01:24:02+5:30
वेळुंजे/त्र्यंबकेश्वर : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सुप्त वाव देत आहेत. एकीकडे शिक्षकांनी डिजिटलसारख्या शिक्षणप्रणाली माध्यमातून शिक्षणावर भर दिल्याने विद्यार्थ्यांच्या ‘डिजिटल’ शिक्षणाविषयी उत्साह वाढीस लागला आहे. मात्र यावर्र्षी कोरोनाने डिजिटल शाळांतील विद्यार्थ्यांचा आनंद हिरावून घेतला असल्याने शिक्षकांच्या संकल्पनेतील डिजिटल शाळेच्या भिंती विद्यार्थ्यांवाचून सुन्यासुन्या पडल्या आहेत.
सुनील बोडके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वेळुंजे/त्र्यंबकेश्वर : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सुप्त वाव देत आहेत. एकीकडे शिक्षकांनी डिजिटलसारख्या शिक्षणप्रणाली माध्यमातून शिक्षणावर भर दिल्याने विद्यार्थ्यांच्या ‘डिजिटल’ शिक्षणाविषयी उत्साह वाढीस लागला आहे. मात्र यावर्र्षी कोरोनाने डिजिटल शाळांतील विद्यार्थ्यांचा आनंद हिरावून घेतला असल्याने शिक्षकांच्या संकल्पनेतील डिजिटल शाळेच्या भिंती विद्यार्थ्यांवाचून सुन्यासुन्या पडल्या आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे वाघेरा (ता. त्र्यंबकेश्वर) येथील ‘कसबेपाडा एक्स्प्रेस’ होय.
तालुक्यात दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळेत डिजिटल क्लासरूम निर्मित होत आहेत. तालुक्यातील अतिदुर्गम आणि जवळपास महाराष्टÑ - गुजरात राज्यांच्या सीमावर्ती भागातील काथवडपाडा येथे जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकांच्या संकल्पनेत प्रथम तालुक्यात डिजिटलवर्ग म्हणून उदयास आली आहे. त्यानंतर अनेक जिल्हा परिषद शाळा डिजिटल क्लासच्या माध्यमाकडे वळल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यात शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या सामाजिक उपक्रमाच्या सहकार्याने शाळा डिजिटल रूपात झाल्या आहेत. यात अनेक शाळांच्या आतून - बाहेरून शिक्षकांनी कल्पनेतून भिंती बोलक्या केल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. वाघेरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ‘कसबेपाडा’ येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीवर कलाशिक्षक संदीप गांगुर्डे यांनी बसचा आकार दिल्याने तालुक्यात ‘कसबे एक्स्प्रेस’ चर्चत आहे. तसेच या शाळेला अनेक शिक्षक भेट ही देत आहेत. कोरोनाने मोठ्या प्रमाणावर फैलाव केल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या संचारबंदी, लॉकडाऊनचा फटका या डिजिटल शाळांनाही बसला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असलेली ‘कसबे एक्स्प्रेस’ ज्ञानार्जनाच्या प्रतीक्षेत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभाग आॅनलाइन शिक्षणप्रणालीचा अवलंब करीत आहे तर कुठे शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांसाठी आॅफलाइन शिक्षणावर भर देत आहे. तालुक्यात काही भागात नेटवर्क नसल्याने आॅनलाइन शिक्षणाचा अभाव दिसून येत असल्याने पर्यायी व्यवस्थेसाठी शिक्षक कार्यरत आहेतच; परंतु शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी सहकार्याच्या कल्पनेतून सजवलेल्या भिंती मात्र विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहेत.लॉकडाऊनचा फटकाकोरोना विषाणू संसर्गाने मात्र देशभर तसेच राज्यातही मोठ्या प्रमाणावर फैलाव केल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या संचारबंदी, लॉकडाऊनचा
फटका या डिजिटल शाळांनाही बसला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असलेली ‘कसबे
एक्स्प्रेस’ ज्ञानार्जनाच्या प्रतीक्षेत आहे.वाघेरा येथील कसबेपाडा शाळेच्या भिंती सामाजिक उपक्रमातून बोलक्या करण्यात आल्या आहेत. शाळेच्या भिंतीवर रेखाटलेले बसचे चित्र लक्ष्य वेधून घेत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे.
- संदीप गांगुर्डे, कलाशिक्षक