..अन् पोलिसांनी दिल्या ज्येष्ठ प्राध्यापिकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 02:53 PM2020-05-08T14:53:12+5:302020-05-08T15:00:19+5:30

पोलिसांनीही सामाजिक बांधिलकी जोपासत गुरू-शिष्याच्या नात्यातील संवेदनांची जाणीव ठेवत या विद्यार्थ्यांच्या ट्विटची दखल घेत कुलकर्णी यांचे घर गाठले.

..Happy birthday to the senior professor given by the police | ..अन् पोलिसांनी दिल्या ज्येष्ठ प्राध्यापिकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा

..अन् पोलिसांनी दिल्या ज्येष्ठ प्राध्यापिकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा

googlenewsNext
ठळक मुद्देवाढदिवसाच्या शुभेच्छा अविस्मरणीय अशाच आहेनिरामय व दिर्घायुष्याची प्रार्थना केली.

नाशिक : गुरु-शिष्याचे नाते हे अतुट असते, शिष्य आपल्या गुरूला कधीही विसरू शकत नाही. अचानकपणे जर कोठे गुरूंची भेट झाली तर शिष्य त्यांचे आशिर्वाद घेतल्याशिवाय राहत नाही. अशाच एका विद्यार्थ्याला आपल्या ज्येष्ठ प्राध्यापिकेचा वाढदिवस लॉकडाउनमुळे साजरा करता आला नाही, तर त्याने सोशलमिडियावर आपल्या शिक्षिकेचा वाढदिवस साजरा केलाच; मात्र उपनगर पोलिसांनाही ट्टिवटरद्वारे आपल्या गुरूवर्यांपर्यंत निदान गुलाबाचे फूल तरी पोहचवावे, अशी विनंती केली अन् मग काय उपनगर पोलिस अन् निर्भया पथकांनाही त्यांच्या गुरूजनांची आठवण झाली आणि त्यांनी वयाच्या साठीत पोहचलेल्या मोटवानीरोडवर राहणाऱ्या प्रा.प्रज्ञा कुलकर्णी यांच्या निवासस्थानी जाऊन ‘डिस्टन्स’ राखत गुलाबपुष्प देत वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या.

मोटवानीरोडवर प्रा. कुलकर्णी यांच्या बहिणीचा बंगला आहे. ५ मे रोजी रात्री आठवाजेच्या सुमारास उपनगर पोलिस ठाण्याच्या तीन व्हॅन सायरन वाजवत कुलकर्णी यांच्या बंगल्याजवळ पोहचल्या. पोलिस आल्याचे पाहून कुलकर्णी भगिणी काहीशा घाबरल्या; मात्र दार उघडल्यानंतर तत्काळ सर्व पोलिसांनी त्यांचे आशिर्वाद घेत गुलाबपुष्प दिले. यामुळे कुलकर्णी यांच्याही डोळ्यांच्या कडा पाणवल्या.

कुलकर्णी या नाशिकरोडच्या मोटवानी रोडवरील सेवानिवृत्त बहिण श्रध्दा यांच्याकडे १७मार्च रोजी आल्या. लॉकडाऊनमुळे त्या तेथेच अडकून पडल्या. त्या या जव्हार महाविद्यालयात मागील ३३ वर्षांपासून मराठी विभागप्रमुखाची जबाबदारी लिलया पार पाडत आहेत. त्यांनी जव्हारमध्ये महिला बचत गटांचा महासंघदेखील स्थापन करत आदिवासी संस्कृतीवर मोठे संशोधनही केले आहे. आदिवासी पाड्यांवर जाऊन त्या नेहमी त्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न या वयातीही करतात. या सर्व कार्यांमुळे त्यांचा विद्यार्थी वर्गही मोठा आहे. मुंबई विद्यापीठासह विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे.

प्रा. कुलकर्णी यांनी 5 मे रोजी साठाव्या वर्षात पदार्पण केले. विद्यार्थ्यांनी अगोदरच ‘सेलिब्रेशन’चा बेत आखला होता. मात्र, अचानक लॉकडाउन झाल्यामुळे त्यांनी आपल्या प्रिय शिक्षकाचा वाढदिवस फेसबुकवरच साजरा केला. मुंबईतील त्यांचा माजी विद्यार्थी मंगेश थोरात याने फेसबुकवर पोस्ट पाहिली. गिफ्ट पाठवणे शक्य नसल्याने उपनगर पोलिसांना टिव्ट करु न आपल्या शिक्षिकेचा पत्ता सांगत त्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा देण्याची विनंती केली.  पोलिसांनीही सामाजिक बांधिलकी जोपासत गुरू-शिष्याच्या नात्यातील संवेदनांची जाणीव ठेवत या विद्यार्थ्यांच्या ट्विटची दखल घेत कुलकर्णी यांचे घर गाठले. वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले, सहाय्यक निरीक्षक खडसे, निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक मुकणे आदींनी गुलाबाची फुले देऊन कुलकर्णी यांचे चरणस्पर्श करत त्यांना नमन करून वाढदिवसाच्या औचित्यावर निरामय व दिर्घायुष्याची प्रार्थना केली. यावेळी कुलकर्णी यांनीही या ‘खाकी’मधील माणसाला सलाम करत त्यांच्याशी काही मिनिटे हितगुज केले आणि क र्तव्यकठोर पोलीसांकडून अशा कठीणसमयी एका माजी विद्यार्थ्यांच्या विनंतीला मिळालेला मान अन् मला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अविस्मरणीय अशाच आहे, असे कुलर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: ..Happy birthday to the senior professor given by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.