‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

By admin | Published: August 27, 2016 11:16 PM2016-08-27T23:16:42+5:302016-08-27T23:20:12+5:30

स्नेहमेळावा : येवला विभागीय कार्यालयाचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात

Happy show on 'Lokmat' | ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

Next

 येवला : येथील बालगोपाळांपासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांच्या उपस्थितीत ‘लोकमत’च्या येवला विभागीय कार्यालयाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा नगर - मनमाड रोडवरील कन्यादान लॉन्सवर मंगलमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, सहकार नेते अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख आदिंसह विविध मान्यवरांनी निवासी संपादक किरण अग्रवाल व सहाय्यक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी तसेच १९८७च्या स्वातंत्र्य समराचे थोर सेनानी तात्या टोपे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन किरण अग्रवाल, बी.बी. चांडक, रमेशचंद्र पटेल, प्रभाकर झळके, उषाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
येवल्याची नवीन ओळख म्हणून नावारूपास आलेला फेटा येथील श्रीकांत खंदारे यांनी सर्व अतिथींना बांधला. सेनापती तात्या टोपे शैक्षणिक संकुलाचे प्रा. बाळासाहेब हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एन्झोकेम विद्यालयातील विद्यार्थिनींनी सुश्राव्य स्वागतगीत व जयोस्तुते गीत सादर करून उपस्थितांची मन जिंकली. याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातील ३९ गुणवंतांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात
आला.
येवला या ऊर्जा देणाऱ्या ऐतिहासिक शहरामध्ये आपापल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नागरिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी लोकमतने केलेला गौरव ही एक अतिशय आनंददायी बाब असल्याचे प्रतिपादन लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांनी केले.
येवला शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील सर्वसामान्य घटकातील जनतेची नाळ ओळखून प्रत्येक क्षेत्रात वेळोवेळी घडणाऱ्या घटनाचा वेध घेऊन सर्वच स्तरातील लोकांना कसा न्याय देता येईल यासाठी लोकमत प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. येवला शहरातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान केल्याने तो खऱ्या अर्थाने लोकमतचाच सन्मान झाला. सामाजिक बांधीलकीचा वारसा जपणारे लोकमत हे केवळ वृत्तपत्र नसून ती एक चळवळ म्हणून पुढे आल्याची भावना लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी व्यक्त केली. विकासाशी संबंधित प्रत्येक बाबतीत लोकमत येवलावासीयां-सोबत राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी आपल्या मिश्कील भाषणात विविध उदाहरणे देऊन लोकमतबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रास्ताविक लोकमतचे तालुका प्रतिनिधी दत्ता महाले यांनी, तर सूत्रसंचालन बाळासाहेब सोमासे यांनी केले.
या सोहळ्यास मनोज दिवटे, सुभाष पाटोळे, संजय कुक्कर, रामेश्वर हाबडे, किशोर सोनवणे, बाळू पहिलवान शिंदे, बापू गाडेकर, मुकेश लचके, अविनाश कुलकर्णी, चंपा रणदिवे, नीलिमा भागवत आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Happy show on 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.