जिल्ह्यात आनंदसरी बरसल्या
By admin | Published: June 2, 2017 02:03 AM2017-06-02T02:03:28+5:302017-06-02T02:03:40+5:30
नाशिक : जूनच्या पहिल्याच दिवशी पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागांत हजेरी लावून शेतकऱ्यांना आनंदीकेले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जूनच्या पहिल्याच दिवशी पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागांत हजेरी लावून शेतकऱ्यांना आनंदी
केले आहे. या पावसाने सुरगाणा, निफाड, चांदवड व मालेगावला जोरदार हजेरी लावली .
सुरगाणा व तालुका परिसरात आज पावसाळ्यातील पहिल्याच दिवशी पावसाचे जोरदार आगमन झाले. पावसामुळे वातावरण थंड झाल्याने उष्णतेपासून सुटका मिळाली. परंतु घाटमाथ्यावरील बोरगाव परिसरात पाऊस झाला नाही.
गेल्या काही दिवसांपासून येथील उष्णतेत वाढ झाली होती. काही वेळा ढग भरून येत परंतु पाऊस न होता उलट उष्णतेत वाढ झाली होती. आजही सकाळपासूनच वातावरणात उष्णता होती. दुपारपर्यंत सूर्य तळपत होता. दुपारी दोन वाजेच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन ढग गरजू लागले व जोरदार वारा वाहू लागला. याचवेळी पावसाचे जोरदार आगमन झाले.
पाऊस सुरू असताना वीज चमकत होती. भर दुपार असूनही संध्याकाळ झाल्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरू झाला नव्हता.
जूनच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली. सुरगाणा शहरासह तालुक्यात उंबरठाण येथेही जोरदार पाऊस झाला. घाटमाथ्यावरील बोरगाव व परिसरात पाऊस झाला नाही. बाऱ््हे व परिसरात हलकासा पाऊस झाला. येथून जवळच असलेल्या गुजरातमधील सापुतारा या पर्यटनस्थळीदेखील पाऊस झाला.शहरापासून जवळच असलेल्या मालगव्हाण येथे वादळी वाऱ््यामुळे भास्कर चव्हाण, रामचंद्र चौधरी, चित्रा चव्हाण आदींच्या घरांचे छप्पर उडून नुसान झाले.