हापूस २२०, तर केशर आंबा १२० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:10 AM2021-05-03T04:10:31+5:302021-05-03T04:10:31+5:30

चौकट - कोणत्याही मालाची टंचाई नाही लॉकडाऊन सुरू असले तरी सर्व मालाची वाहतूक सुरळीत असल्याने किराणा बाजारात कोणत्याही वस्तूची ...

Hapus 220, while saffron mango 120 rupees per kg | हापूस २२०, तर केशर आंबा १२० रुपये किलो

हापूस २२०, तर केशर आंबा १२० रुपये किलो

Next

चौकट -

कोणत्याही मालाची टंचाई नाही

लॉकडाऊन सुरू असले तरी सर्व मालाची वाहतूक सुरळीत असल्याने किराणा बाजारात कोणत्याही वस्तूची टंचाई नाही. सर्व वस्तूंचे भाव स्थिर आहेत. खाद्यतेलाच्या दरांमध्ये थोडा चढउतार झाला आहे.

चौकट-

कारले २७ रु. किलो

वातावरणातील बदल, वाढता उष्मा यामुळे बाजार समितीत पालेभाज्यांची आवक मंदावली आहे. कारले १७ पासून २७ रुपये किलो, तर वांगी पाच रुपयांपासून २५ रुपये किलोपर्यंत विकली जात आहे. कांदापातीला चांगला दर मिळत आहे.

चौकट-

खरबुज २२ रु. किलो

फळबाजारात फळांची आवक स्थिर असून, फळांना मागणी चांगली आहे. टरबूज ५ ते ११ रुपये, तर खरबूज १३ ते २२ रुपये किलोने विकले जात आहे. नाशिक बाजारात आंब्याचे आगमन झाले असून, आंब्याला चांगला भाव मिळत आहे.

कोट -

लॉकडाऊनमध्ये किराणा दुकानांना दिलेली वेळ चुकीची असून, त्यामुळे ग्राहकी कमी झाली आहे. दुकान उघडल्यानंतर सकाळी ९ वाजेपर्यंत ग्राहकच नसतात. १० नंतर ग्राहक सुरू होतात; पण तोपर्यंत दुकान बंद करण्याची वेळ होते. - शेखर दसपुते, किराणा व्यापारी

कोट -

मागीलवर्षी कोरोनामुळे भाजीपाल्याला मोठा फटका बसला होता. तेच याहीवर्षी होत आहे. किराणा बाजार सुरू असल्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे. वातावरण बदलामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. - दिलीप गायधनी, शेतकरी

कोट-

किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाल्याचे दर काही कमी केलेले नाही त्यामुळे आमच्यासारख्या ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. कोरोनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. - मनीषा निकम, गृहिणी

Web Title: Hapus 220, while saffron mango 120 rupees per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.