लासलगावमार्गे हापूस आंबा आॅस्ट्रेलियात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 01:12 PM2018-05-14T13:12:30+5:302018-05-14T13:12:30+5:30

लासलगाव ( शेखर देसाई ) :- आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणारा आणि फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणच्या हापूस आंब्याची निर्यात लासलगावमार्गे अमेरिकेनंतर आता आॅस्ट्रेलियात सुरु झालेली आहे. लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून हापूस आंब्यावर विकिरण प्रक्रि या होऊन भारतातून आॅस्ट्रेलियात पहिला कंसायमेंट तीन मेट्रिक टन हापूस आंबा रवाना करण्यात आला.

Hapus Mango to Australia via Lasalgaon | लासलगावमार्गे हापूस आंबा आॅस्ट्रेलियात रवाना

लासलगावमार्गे हापूस आंबा आॅस्ट्रेलियात रवाना

Next

लासलगाव ( शेखर देसाई ) :- आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणारा आणि फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणच्या हापूस आंब्याची निर्यात लासलगावमार्गे अमेरिकेनंतर आता आॅस्ट्रेलियात सुरु झालेली आहे. लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून हापूस आंब्यावर विकिरण प्रक्रि या होऊन भारतातून आॅस्ट्रेलियात पहिला कंसायमेंट तीन मेट्रिक टन हापूस आंबा रवाना करण्यात आला. या हंगामात सुरु वातीला परतीचा पाऊस, ओखी वादळाचा परिणाम यामुळे यंदा आंब्याचा मोहोर गळून गेल्याने यंदा निर्यातक्षम आंब्याची उपलब्धता न झाल्याने परदेशात निर्यात करण्याची प्रक्रि या १५ ते २० दिवस लांबणीवर पडली होती. या हंगामात आता पर्यंत अमेरिकेला १७० मेट्रिक टन हापूस आंबा रवाना झाला तर आॅस्ट्रेलियात तीन मेट्रिक टन रवाना झाला आहे. लासलगाव येथे ३१ आॅक्टोंबर २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलिबहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, येथे आता फक्त आंब्यावर विकिरण करून तो निर्यात केला जात आहे. आॅस्ट्रेलिया व अमेरिकेला जाणाऱ्या आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे.
--------------------------
विकिरण प्रक्रि या म्हणजे?
लासलगावच्या केंदात गॅमा किरणांचा ४०० ते ७०० ग्रे मात्रा विकिरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रि या तर लांबतेच, शिवाय कोयीतील कीडही नष्ट होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निर्मितीची प्रक्रि याही थांबते. कीड रोखण्यास हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रि या होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.
------------
भाभा अणु संशोधन केंद्रात प्रक्रि या होऊन तो मुंबईमार्गे आॅस्ट्रेलियासाठी रवाना करण्यात आला आहे. भारतीय आंब्यांना आॅस्ट्रेलियात
मागणी मिळत असल्याने जून अखेरपर्यंत ४० ते ५० टन आंबा निर्यात होण्याची शक्यता आहे.

Web Title: Hapus Mango to Australia via Lasalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक