हर हर गंगे, हर हर गोदे...
By Admin | Published: September 30, 2015 12:12 AM2015-09-30T00:12:25+5:302015-09-30T00:13:49+5:30
संगीत कुंभपर्व : सुरेल मैफलीत रसिक तल्लीन
नाशिक : ‘हर हर गंगे, हर हर गोदे’, ‘चलोयन गंगा जमुना तीर’, ‘मैं राधा तू श्याम रे’ यांसारख्या विविध संतांच्या भक्तिपूर्ण रचनांच्या मैफलीत रसिक तल्लीन झाले. निमित्त होते सद्गुरू नारायण सांस्कृतिक अधिष्ठानच्या वतीने आयोजित ‘संगीत कुंभपर्व’ मैफलीचे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम रंगला.
सद्गुरू नारायण महाराज केडगाव बेट येथील गुरुपौर्णिमेनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी संगीतबद्ध केलेली सिंहस्थ कुंभपर्व गीते, अभंग, हिंदी भजने, तसेच संत सूरदास, संत मीराबाई, संत कबीर, संत नामदेव आदिंच्या रचना या मैफलीत सादर करण्यात आल्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री हिमालय बाबा, बलरामस्वामी, गीतकार हेमंत आवळसकर, डॉ. अंबादास कुलकर्णी, जनार्दन बेलगावकर, गिरीश चंद्रात्रे यांची उपस्थिती होती.
श्रीकृष्ण चंद्रात्रे, अस्मिता सेवेकरी, ज्ञानेश्वर कासार, श्रेयसी राय, नंदकुमार देशपांडे, गिरीश चंद्रात्रे, प्रमोद दक्षिणी, हेमंत शेजवळकर यांनी गायन केले. आनंद शहाणे, राजन अग्रवाल, प्रसाद भालेराव यांनी संगीतसाथ केली, तर सोहम चंद्रात्रे यांनी निवेदन केले. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. (प्रतिनिधी)