हर हर महादेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:08 AM2017-08-01T01:08:52+5:302017-08-01T01:09:11+5:30
हर हर महादेव, त्र्यंबकेश्वर भगवान की जय, असा जयघोष करीत शेकडो शिवभक्तांनी श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी पर्वताची दुसºया सोमवारची फेरी पूर्ण करून दर्शनाच् ाा लाभ घेतला. सोमवारनिमित्त जिल्हाभरातून येथे आलेले भाविक मोठ्या संख्येने या फेरीत सहभागी झाले होते. महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यात आला.
त्र्यंबकेश्वर : हर हर महादेव, त्र्यंबकेश्वर भगवान की जय, असा जयघोष करीत शेकडो शिवभक्तांनी श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी पर्वताची दुसºया सोमवारची फेरी पूर्ण करून दर्शनाच् ाा लाभ घेतला. सोमवारनिमित्त जिल्हाभरातून येथे आलेले भाविक मोठ्या संख्येने या फेरीत सहभागी झाले होते. महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर विधिवत पूजन व महाआरती करण्यात आली. सोमवार असल्याने भाविकांनी पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरात दर्शनासाठी येणाºया भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. श्रावणी सोमवार निमित्ताने मंदिर व परिसरात विविध पूजा, अभिषेक करण्यासाठी भाविकांनी मंदिरातील ब्रह्मवृंदाकडे गर्दी केली होती. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने मंदिराकडे येणाºया सर्व रस्त्यांवर लोखंडी बॅरिकेडिंग करून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. या रस्त्याने केवळ पायी जाणाºया भाविकांना सोडले जात होते. तिसºया सोमवारी रक्षाबंधन येत असल्याने भाविकांनी दुसºया सोमवारीच ब्रह्मगिरीला फेरी मारली. यामुळे यंदाच्या श्रावणातील दुसºया सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे गर्दी वाढली होती. तिसºया सोमवारी चंद्रग्रहण असल्याने रात्रीची फेरी मारण्यास अनेक भाविक उत्सुक नसल्याची चर्चा होती. फेरी मार्गावर अनेक स्वयंसेवी संघटनांनी खिचडी व केळी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. कार्यकर्त्यांचा उत्साहही दांडगा
होता. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना चिखलाचा त्रास जाणवला नाही.
श्रीक्षेत्र पहाडेश्वर मंदिरात गर्दी
ब्राह्मणगाव : येथील उत्तरेकडील प्रसिद्ध शिवमंदिर श्रीक्षेत्र पहाडेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी दर्शन घेतले. या परिसरात पावसाळी वातावरण व डोंगर परिसरात हिरवळ असल्याने निसर्गसौंदर्य बघण्यासाठीही भाविकांची गर्दी अधिकच वाढली आहे. प्रत्येक सोमवारी भाविक येथे हजेरी लावतात. वातावरण आल्हाददायक असल्याने व अचानक पावसाच्या श्रावण सरी येत असल्याने लहान बालके पावसात भिजण्याचा आनंद घेत आहेत. ब्राह्मणगाव येथे एकूण आठ- नऊ शिव मंदिरे आहेत. परिसरातील भाविक जवळच्या शिव मंदिरात जाऊन दर्शन घेत आहेत.
पावसाचा आनंद घेत प्रदक्षिणा करण्यास जात होते, तर सकाळपर्यंत परतत होते. येताना मात्र आपापल्या ग्रुपने अत्यंत थकलेल्या अवस्थेत परतत होते. रात्री अत्यंत उत्साहाने व आनंदाने पळतच जाणारे भाविक प्रदक्षिणा मार्गावरील चढ-उतार, दºयाखोºयातून उतरु न अत्यंत थकलेल्या अवस्थेत परतताना दिसत होते.
रात्री उत्साहात गेले ते हेच का, असा प्रश्न पडत होता.