‘हर हर महादेव’चा शिवमंदिरांमध्ये जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 10:39 PM2020-02-22T22:39:51+5:302020-02-23T00:26:20+5:30

इगतपुरीच्या पूर्वभागात असलेल्या गोंदे दुमाला, नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे येथील असलेल्या महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी केली होती. विविध ठिकाणी भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Har Har Mahadev praises Shiva temples | ‘हर हर महादेव’चा शिवमंदिरांमध्ये जयघोष

‘हर हर महादेव’चा शिवमंदिरांमध्ये जयघोष

Next

घोटी/नांदूरवैद्य : इगतपुरीच्या पूर्वभागात असलेल्या गोंदे दुमाला, नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे येथील असलेल्या महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी केली होती. विविध ठिकाणी भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटपदेखील करण्यात येत होते. कार्यक्रमाची सुरुवात नांदूरवैद्य येथील महादेव मंदिरात असलेल्या महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक व महापूजा करण्यात आली. या परिसरात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. बेल, फुले, पाने वाहून शिवशंकराचे दर्शन भाविक घेत होते. त्याचप्रमाणे अनेक शिवमंदिरांमध्ये दुग्धाभिषेक करण्यात येत होता.
दिंडोरी तालुक्यातील शिवमंदिरांमध्ये गर्दी
महाशिवरात्रीनिमित्त शहरासह तालुक्यातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिंडोरी येथील पुरातन रामेश्वर शिवमंदिरात पहाटेपासून शिवभक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. विविध मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आली होती. श्रीक्षेत्र देवघर येथे भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. येथील मंदिर पुरातन असून, येथील मंदिराचे जीर्णोद्धारचे काम रखडल्याने भाविकांनी काहीशी नाराजी व्यक्त करीत लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यासह गुजरातमधील दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रीक्षेत्र करंजी येथे शिवरात्रीनिमित्त यात्रा पार पडली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील भाविकांनी येथील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. करंजी जाण्यासाठी असलेल्या दोन्ही बाजूच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त करत तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमातून रस्त्यांचे नूतनीकरण करण्याची मागणी केली
आहे.

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : तोरंगण (त्र्यं.) ता. त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्र माची सांगता विठ्ठल महाराज घोटविहिरा यांच्या कीर्तनाने झाली. त्यात काकडा आरती, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, भारु ड असे धार्मिक कार्यक्र म झाले. यावेळी ह.भ.प. विठ्ठल महाराज यांनी महाशिवरात्रीचे महत्त्व विशद केले.

 

Web Title: Har Har Mahadev praises Shiva temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.