प्रभागातील नागरिक कचऱ्याच्या समस्येने हैराण

By admin | Published: October 27, 2016 11:29 PM2016-10-27T23:29:08+5:302016-10-27T23:47:05+5:30

प्रभागातील नागरिक कचऱ्याच्या समस्येने हैराण

Haraan by the residents of the affected areas | प्रभागातील नागरिक कचऱ्याच्या समस्येने हैराण

प्रभागातील नागरिक कचऱ्याच्या समस्येने हैराण

Next

मनमाड : नांदगाव रोडच्या दक्षिणेपासून सुरू झालेल्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये माउलीनगर, आंबेडकरनगर, आंबेडकर बोर्डिंग, विवकानंदनगर-१, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, सुनील सर्व्हिस स्टेशन ते राजगुरू कॉम्प्लेक्स, गौतमनगर, सोनावाला कॉम्प्लेक्स, हॉटेल सह्याद्री, बरडिया कांदा चाळ, ग्रामीण रुग्णालय, कॉलेज रोड दर्शन हॉटेल, चंद्रभागा लॉन्स आदि परिसर येतो.
प्रभाग क्रमांक चार हा अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण गटाच्या उमेदवारासाठी राखीव आहे. या प्रभागाची लोकसंख्या ४९९५ असून, मतदारसंख्या ३३३२ आहे. यामध्ये १७३९ पुरुष व १५९३ महिलांचा समावेश आहे. माउली नगरसह काही भाग नांदगाव महामार्गालगत येत असल्याने या ठिकाणी नवीन घरकुल उभारणीला वेग आला आहे.
नवीन प्रभागरचनेमुळे पूर्वीच्या प्रभागातील काही भाग वगळण्यात आला आहे तर काही भाग नवीन जोडण्यात आला आहे. या संबंधित भागांसाठी सध्या नूतन पगारे, गणेश धात्रक, सुषमा नलावडे, योगीता शिरसाठ हे नगरसेवक आहे.रस्ते, गटारी, समाजमंदिर आदि विकासकामे या भागात झाली आहे. कचऱ्याची व स्वच्छतेची समस्या या भागात नेहमी भेडसावत असते. (वार्ताहर)

Web Title: Haraan by the residents of the affected areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.