हरणबारी ,केळझर मधून रब्बीसाठी दोन आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 04:49 PM2020-01-24T16:49:08+5:302020-01-24T16:50:05+5:30
सटाणा:बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तन सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरिक्षत करण्याचा निर्णय आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
सटाणा:बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तन सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरिक्षत करण्याचा निर्णय आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
तालुक्यातील हरणबारी मध्यम प्रकल्पातून सुमारे २ हजार १५ हेक्टर या रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते तर केळझर मध्यम प्रकल्पातून १ हजार१८० हेक्टर रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते .यंदा या रब्बी हंगामासाठी शेतकº्यांनी पाण्याच्या तीन आवर्तनाची मागणी केली होती .मात्र पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणात वाढ झाल्याने रब्बीसाठी दोनच आवर्तनाचे नियोजन करण्यात आल्याचे यावेळी कार्यकारी अभियंता चौधरी यांनी स्पष्ट केले .शेतकर्यांच्या मागणीनुसार हरणबारी धरणातून रब्बीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले असून२५० दशलक्ष घनफूट पाणी देण्यात येणार आहे .उर्वरित पाण्याचे दुसरे आवर्तन २५ फेब्रुवारीला सोडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला .तर केळझर धरणातून येत्या १० फेब्रुवारीला पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.यासाठी १५४ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे .दरम्यान आमदार दिलीप बोरसे यांनी रब्बीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत कसे पोहचेल यासाठी आवश्यक ठिकाणी कालव्यांची दुरु स्ती करावी .तसेच रब्बी पिकासाठी ठरल्याप्रमाणे दिले जाणारे दोन्ही आवर्तने शेवटच्या शेतकº्याच्या शेत पर्यंत कसे पोहचेल यासाठी नियोजन करावे .जेणेकरून पेरा केले पिक हातात येईल अशा सूचना यावेळी संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या .बैठकीस आदर्श गाव किकवारीचे प्रणेते केदाबापू काकुळते ,बाळासाहेब भदाणे ,पांडुरंग सोनवणे ,माधवराव सोनवणे ,जनार्दन सोनवणे ,भास्कर सोनवणे आदी शेतकरी उपस्थित होते .
असा आहे रब्बीचा सिंचन आराखडा ...
हरणबारी धरण पाणी साठा ११६६ दशलक्ष घनफूट ,पैकी बाष्पीभवन तुट ११७ दशलक्ष घनफूट ,पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ३९० दशलक्ष घनफूट ,रब्बी हंगामासाठी ६५९ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे.केळझर धरणात ५७२ दशलक्ष घनफूट पाणी साठा आहे .पैकी बाष्पीभवन तुट ८६ दशलक्ष घनफूट ,पिण्यासाठी १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे . ३८५दशलक्ष घनफूट पाणी रब्बीसाठी आरिक्षत करण्यात आले आहे .