बीएसएनएलच्या सुमार सेवे मुळे कादवा परिसरात ग्राहक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 02:57 PM2020-07-29T14:57:29+5:302020-07-29T14:59:42+5:30
दिंडोरी : अडचणीत असलेल्या बीएसएनएलने दर्जेदार सेवा देत ग्राहकांना आपलेसे करण्याची आवश्यकता असताना बीएसएनएल कडून दुर्लक्ष होत असून कादवा सहकारी साखर कारखाना येथील दूरध्वनी सेवा सातत्याने विस्कळीत होत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत असून सेवेत सुधारणा होत नसल्याने येथील ग्राहक बीएसएनएल कारभाराला कंटाळून व सतत पाठपुरावा करुन हैराण झाले आहेत. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरीत लक्ष देत सेवा सुरळीत करावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

बीएसएनएलकडे सर्वाधिक जाळे असताना सुमार सेवेमुळे ग्राहकांनी बीएसएनएलला रामराम ठोकत इतर खाजगी कंपन्यांची सेवा घेतली त्यामुळे बीएसएनएल अडचणीत आली आहे. एकीकडे बीएसएनएलच्या पूर्णजीवनसाठी विविध योजना आखल्या जात असताना दुसरीकडे दर्जेदार सेवा देण्याकडे दुर्लक्ष होत आहे. कादवा कारखाना परिसरात बीएसएनएलकडे दूरध्वनी, ब्रॉडबँड, मोबाईलचे भरपूर कनेक्शन आहे. मात्र येथील केंद्रातून मिळणारी सेवा सुमार दर्जाची आहे. वारंवार सेवा खंडित होत आहे.
येथील केंद्रातील बॅटरी खराब झाल्याने विजेच्या लपंडावासोबत येथील सेवा नॉट रीचेबल होत आहे, त्यामुळे कादवा कारखाना, बँक व इतर व्यावसायिकांना त्रास होत त्यांचे कामकाज ठप्प होत आहे. एकदा बिघाड झाला की दोन तीन-दिवस सेवा ठप्प होत आहे. वारंवार तक्र ार करूनही सेवा सुरळीत होत नाही. अधिकारी वरिष्ठ पातळीवरून आवश्यक दुरु स्ती साहित्य मिळत नसल्याचे सांगत टोलवाटोलवी करत आहे.
दरम्यान दोन ते तीन खाजगी कंपन्या हायस्पीड इंटरनेट सेवा जाळे गावोगाव पोहोचवत असून बीएसएनएल सेवा सुरळीत देत नसल्याने ग्राहक खाजगी कंपन्यांकडे वळू लागले आहेत.