खंडग्रास सूर्यग्रहण न दिसल्याने हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 11:45 PM2019-12-26T23:45:25+5:302019-12-26T23:47:03+5:30

सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शनच झाले नाही आणि नऊ वर्षांनंतर आलेले खंडग्रास सूर्यग्रहण मालेगावकरांना दिसू न शकल्याने त्यांच्या हिरमोड झाला. यात नागरिकांनी दूरदर्शनवर जगभरातील सूर्यग्रहणाचा लाभ घेऊन आनंद घेतला. सरत्या वर्षाला निरोप देताना निसर्गाचा अविस्मरणीय असा आविष्कार याची देही याची डोळा बघण्याची संधी होती. मात्र सकाळपासूनच आभाळ भरून आल्याने सूर्यदर्शनच झाले नाही. खंडग्रास सूर्यग्रहणाचा अद्भूत नजराणा डोळ्यात साठविण्याची संधी निसर्गानेच दिली नाही आणि समस्त मालेगावकरांना या संधीपासून मुकावे लागले.

Haremode due to no visible solar eclipse | खंडग्रास सूर्यग्रहण न दिसल्याने हिरमोड

खंडग्रास सूर्यग्रहण न दिसल्याने हिरमोड

googlenewsNext
ठळक मुद्देमालेगाव : ग्रहण दर्शनात धुक्याचा अडसर

संगमेश्वर : आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शनच झाले नाही आणि नऊ वर्षांनंतर आलेले खंडग्रास सूर्यग्रहण मालेगावकरांना दिसू न शकल्याने त्यांच्या हिरमोड झाला. यात नागरिकांनी दूरदर्शनवर जगभरातील सूर्यग्रहणाचा लाभ घेऊन आनंद घेतला.
सरत्या वर्षाला निरोप देताना निसर्गाचा अविस्मरणीय असा आविष्कार याची देही याची डोळा बघण्याची संधी होती. मात्र सकाळपासूनच आभाळ भरून आल्याने सूर्यदर्शनच झाले नाही. खंडग्रास सूर्यग्रहणाचा अद्भूत नजराणा डोळ्यात साठविण्याची संधी निसर्गानेच दिली नाही आणि समस्त मालेगावकरांना या संधीपासून मुकावे लागले.
तरीही अनेकांनी दूरदर्शनवर याचा आनंद घेतला. सकाळी ८ ते ११ या वेळेत पूजापाठ करण्यात वेळ घालविला. सकाळी ११ वाजेनंतर सूर्यग्रहण संपल्यानंतर अनेकांनी स्नान करून दानधर्म केले. शहरातील शाळांमधून विद्यार्थ्यांना दूरदर्शनवर सूर्यग्रहण दाखविले. मालेगाव कॅम्पातील बाल विद्या निकेतन शाळा, संगमेश्वरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा या संस्थांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दूरदर्शनवरील जगभरातील सूर्यग्रहण दाखविले. अति धुक्यामध्ये मालेगावात ग्रहण बघता आले नाही; मात्र आम्ही विद्यार्थ्यांना दूरदर्शनच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण दाखवून सूर्यग्रहणाबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितल्याचे बालविद्या निकेतन शाळेचे मुख्याध्यापक नचिकेत कोळपकर यांनी सांगितले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सूर्यग्रहणाविषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. ग्रहणावेळी कोणतेही धोकादायक किरणे बाहेर पडत नाहीत. ग्रहण म्हणजे खेळ सावल्यांचा या शब्दांत नागरिकांचे समाज माध्यम व इतर माध्यमातून प्रबोधन करून ग्रहणाच्या खगोलीय आविष्काराचा आनंद घेण्याचे आवाहन अंनिसच्या वतीने करण्यात आले होते.
ढगाळ वातावरणामुळे खगोलप्रेमी नाराज
मालेगाव शहर व परिसरात मंगळवारी रात्री अचानक तुरळक पावसाचा शिडकावा झाला, तर बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. हेच वातावरण आज गुरूवारीही कायम राहिले. दुपारपर्यंत सूर्यनारायण ढगाआड राहिल्याने उन्हाचा पत्ता नव्हता. परिणामी नऊ वर्षांनंतर आलेले खंडग्रास सूर्यग्रहण याची देही याची डोळा बघण्याची संधी मालेगावकरांना मिळाली नाही. त्यामुळे खगोलप्रेमी नाराज झाले.

Web Title: Haremode due to no visible solar eclipse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.