येवला परिसरात चोरट्यांचे पुनश्च हरी ओम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 08:46 PM2020-07-15T20:46:21+5:302020-07-16T00:12:21+5:30

येवला : अनलॉकच्या टप्प्यात पुनश्च हरी ओम होत असतांना चोरट्यांनीही आपले मिशन सुरू केले आहे. शहरासह तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्या तीन मिहन्यात तालुक्यात चोऱ्यांच्या तीसहून अधिक घटना घडल्या असून यात सर्वाधिक चोºया दुचाकींच्या आहेत.

Hari Om of thieves in Yeola area ... | येवला परिसरात चोरट्यांचे पुनश्च हरी ओम...

येवला परिसरात चोरट्यांचे पुनश्च हरी ओम...

Next

येवला : अनलॉकच्या टप्प्यात पुनश्च हरी ओम होत असतांना चोरट्यांनीही आपले मिशन सुरू केले आहे. शहरासह तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्या तीन मिहन्यात तालुक्यात चोऱ्यांच्या तीसहून अधिक घटना घडल्या असून यात सर्वाधिक चोºया दुचाकींच्या आहेत. याबरोबरच गेल्या काही आठवड्यांत छोट्या-मोठ्या चोºयाही अनेक घटना घडल्याने नागरिकांनी आत्मनिर्भर होवून स्वत:च काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाच्या पाशर््वभूमीवर लागू असणार्?या लॉकडाऊनने बाजारपेठा व सर्वच उद्योगसधंदे बंद राहिले तर कोरोनाच्या भीतीने सर्वच घरातच बसून राहिल्याने उन्हाळ्यात प्रमाण कमी झाले होते. मात्र, अनलॉकचा पहिला टप्पा सुरु झाला आणि चोºयांचे सत्र सुरू झाले. कोरोनाने पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण अजूनही कमी झालेला नसल्याने नेमका याचा फायदा चोरटे घेतांना दिसून येत आहे.
मागील दोन आठवड्यात तालुक्यात शेळ्या, मोबाईल, घरफोडी, लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील अनकुटे येथील एका टोळीने पालघरच्या व्यापाºयाला कोपरगाव शिवारात लुटले, बाभूळगाव येथे किरण गायकवाड यांच्या घरापुढून दोन नव्या मोटारसायकली रात्रीतून चोरीला गेल्याच्या घटना मागील काही दिवसात घडल्या आहेत. थळकर वस्तीजवळ एकजण मोबाईलवर बोलत असतांना त्याच्या हातातून मोबाईल हिसकावला गेला तर धामणगावला एका शेतकºयाच्या शेळ्या चोरीस गेल्या. गवंडगाव येथे मोटार सायकलीसह पेट्रोलपंपावर तीन हजार लिटर डिझेलची चोरी झाली. अंदरसूलला दळे वस्ती येथील पंढरीनाथ जाधव यांच्या मालकीच्या किराणा दुकानचे शटर वाकवून रोकड व किराणा माल चोरु न नेल्याची घटना घडली.
---------------
१४ दुचाकी चोरीची नोंद
कातरणी येथे संतोष कदम यांच्या घरातून चोरट्यांनी दोन दिवसांपूर्वी सोने, पैशासह वस्तू नेल्या. मार्च ते जून महिन्यादरम्यान, शहर व तालुक्यात घराफोड्या व चोºयांच्या बारा घटना घडल्या असून, दुचाकी वीसवर चोरी गेल्या आहेत. मात्र, दोन्ही पोलिस ठाण्यात १४ दुचाकी चोरीच्या नोंदी आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात एकही घटना घडली नसली तरी जून नंतर मात्र चोरीच्या दहावर घटना घडल्या आहेत.

Web Title: Hari Om of thieves in Yeola area ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक