महिरावणीला अखंड हरिनाम सप्ताह
By admin | Published: May 11, 2016 10:50 PM2016-05-11T22:50:55+5:302016-05-12T23:59:14+5:30
महिरावणीला अखंड हरिनाम सप्ताह
सातपूर : लहान मुलांना ज्ञानेश्वरीचे महत्त्व समजावे, त्याची गोडी लागावी, या उद्देशाने निष्काम कर्मयोगी शिवराम महाराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिरावणी गावात अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ करण्यात आला आहे.
ब्रह्मनिष्ठ निष्काम कर्मयोगी शिवराम महाराज म्हस्कर (अजाण वृक्ष आश्रम पिपळद ) नाशिक यांच्या प्रेरणेने व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गेल्या २६ वर्षांपासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन यावर्षीदेखील महिरावणी गावात ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहनिमित्ताने महिरावणी गावात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ११ ते १२ गाथाभजन, दुपारी ३ ते ६ महाराष्ट्रातील थोर भागवतकार निवृत्ती महाराज नाटकर यांचे श्रीमद्भागवत कथा, संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ९ ते ११ कीर्तन असे धार्मिक कार्यक्र म आहेत. या अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्यामुळे महिरावणी गाव आणि परिसरात भक्तिमय व सांप्रदायिक वातावरण निर्माण झाले आहे. शनिवार (दि. १४) सकाळी ९ ते ११ या वेळेत भागवताचार्य संजीवदास महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. (वार्ताहर)