हरिहर भेटनिमित्त कपालेश्वर मंदिरात देवाला साजशृंगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 11:43 PM2018-11-21T23:43:45+5:302018-11-22T00:16:02+5:30
देवदिवाळी हरिहर भेट सोहळ्यानिमित्ताने कपालेश्वर महादेव मंदिर येथे बुधवारी (दि.२१) श्री कपालेश्वर भक्त मेळा परिवाराच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हरिहर भेटनिमित्त मंगळवारी सुरू करण्यात आलेल्या विष्णूयागाचा बुधवारी दुपारी अभिषेक पूजनाने ब्रह्यवृंदांच्या उपस्थितीत मंत्रोच्चार करून समारोप करण्यात आला. यावेळी मंदिराचे गुरव पप्पू गाडे यांनी सपत्नीक पूजन केले.
पंचवटी: देवदिवाळी हरिहर भेट सोहळ्यानिमित्ताने कपालेश्वर महादेव मंदिर येथे बुधवारी (दि.२१) श्री कपालेश्वर भक्त मेळा परिवाराच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हरिहर भेटनिमित्त मंगळवारी सुरू करण्यात आलेल्या विष्णूयागाचा बुधवारी दुपारी अभिषेक पूजनाने ब्रह्यवृंदांच्या उपस्थितीत मंत्रोच्चार करून समारोप करण्यात आला. यावेळी मंदिराचे गुरव पप्पू गाडे यांनी सपत्नीक पूजन केले. देवदिवाळी हरिहर भेटनिमित्त कपालेश्वर महादेव मंदिरात विष्णू-शंकर आरास केली होती. महादेवाच्या पिंडीवर आकर्षक सजावट करण्यात येऊन देवाला साजशृंगार केला होता. गुरुवारी (दि.२२) अर्धनारीनटेश्वर दर्शन, शुक्रवारी (दि.२३) शंकर पार्वती अशी आरास कपालेश्वर मंदिरात केली जाणार आहे. देवदिवाळीनिमित्त दरवर्षी कपालेश्वर मंदिरातून बेलपान सुंदर नारायण मंदिरात तर सुंदर नारायण मंदिरातून तुळशीपत्र कपालेश्वर महादेव मंदिरात आणले जाईल. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी व महादेवाच्या जयघोषात मध्यरात्रीच्या सुमाराला हरिहर भेट सोहळा रंगत असतो.