हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी उभारली रोप वाटीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 05:27 PM2018-09-30T17:27:05+5:302018-09-30T17:29:51+5:30
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमातंर्गत रोपवाटिकेची निर्मिती केली आहे.
विद्यालयातील इको क्लबचे विद्यार्थी यश सांगळे, वैभव सांगळे, युवराज पाटोळे, सिद्धार्थ जगताप, सचिन बिन्नर, कुणाल निकाळे, दिपक अस्वले, जयराज बिन्नर, सुयोग मेंगाळ, शुभम जगताप, रोहित जगताप, शुभम काकड, शरद गुंड, शहेजाद खान, समाधान डगळे, मनोज शिंदे, वैष्णवी रेवगडे, निकिता केदार, वैष्णवी शिंदे, अनुष्का काकड, पुजा पालवे आदी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून या रोपवाटिकेची निर्मिती करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेल्या बीजसंकलनातून ‘बीया’ निवडून शाळेच्या परिसरात जमा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर घनकच-यातून निर्माण केलेल्या कंपोस्ट खताचा रोपे निर्मितीसाठी विद्यार्थ्यांनी वापर केला आहे. कडुनिंब, वड, पिंपळ, आंबा, बदाम, जांभूळ, अशोका, उंबर, जास्वंद, विलायती चिंच, चिंच, तुळस, कोरपड, गुलाब, मोगरा अश्या दोन हजार रोपांची निर्मिती केली आहे. विद्यालय परिसर वेलवर्गीय वनस्पतीच्या सुवासिक फुलांनी दरवळून गेला आहे. रोपवाटिकेत निर्माण झालेल्या वनस्पतींचे विद्यार्थ्यांनी आपले घर, शेती परिसरात ही रोपे लावून त्यांचे संगोपन ही करत आहे. यावेळी हरित सेना विभाग प्रमुख वाय.एम. रूपवते, व्ही.एस. वाघचौरे, आर.बी. नान्नोर, ए.बी. कचरे, एस. पी. रेवगडे, अझहर मणियार, एस. डी. सरवार, प्राचार्य व्ही. एस. कवडे, पर्यवेक्षक बी.बी. पगारे, जे. एच. वलवे, सिन्नर येथील सामाजिक वनीकरण सिन्नरचे वनपाल एस. टी. मोटकरी, सी. डी. चव्हाण, दर्शना चौपुरे, पुष्पा बुरकुल आदींच्या मार्गदशनाखाली या रोपवाटिकेची निर्मिती करण्यात आली आहे.