उन्हाच्या तीव्रतेने जनावरांसह ग्रामस्थ हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 05:08 PM2019-04-26T17:08:05+5:302019-04-26T17:08:56+5:30
नि-हाळे : चारा व पाणीटंचाईबरोबर उन्हाची तीव्रता वाढल्याने जनावरांसह ग्रामस्थ हैराण झाले आहेत. सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात उन्हाच्या तीव्रतेमुळे ग्रामस्थांना पाणीटंचाई जाणवत आहे. उन्हाची तीव्रतेत बरीच वाढ झाली असून सकाळपासून सूर्यनारायण आग ओकत असल्यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत.
खेड्यापाड्यात सध्या चारा व पाण्याच्या शोधात रानोमाळ भटकंती करणाऱ्या पशुपालकांचे सर्वाधिक हाल होत आहेत. चारा पाण्याच्या शोधात त्यांना शेत शिवारात दिवसभर भटकंती करावी लागत आहे. परिसरातील नदी, नाले, पाझरतलाव, शेततळे, विहिरी कोरडे ठाक पडले आहेत. जनावरांना पाणी पाजण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत असल्याचे मेंढपाळ शांताराम शिंगाडे, वाळीबा शिंगाडे यांनी सांगितले. पशुपालकांना उन्हाच्या तडाख्यामुळे दिवसभराचे नियोजन करावे लागत असल्याचेही ते म्हणाले. तालुक्याच्या काही भागात हिरवळ असली तरी पूर्व भागात पिण्याच्या पाण्याचे भयंकर दुर्भिक्ष्य जाणवत आहे. पशुपालक स्वत:ला लागणा-या पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांना लागणाºया पाण्याचा साठी करून ठेवत आहेत. दिवसभर रानात फिरून येणा-या जनावरांपुढे वैरण नाही तर उसाचे वाडे विकत घेऊन जनावरांना टाकावे लागत आहे. चारा विकत घेवून जनावरांची भूक भागवावी लागत आहे. वासराच्या हंबरण्याने पान्हा फोडणा-याला गाईला आता दुष्काळात पान्हा फुटेनासा झाला आहे. वाढत्या तपमानामूळे दुध उत्पादनावर विपरीत परिणाम होत असून १० ते १५ लिटर दुध देणारे जनावर ४ ते ५ लिटर दुध देऊ लागले आहे.