उद्योगवृद्धीसाठी कामगारांशी सौहार्द आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:19 AM2018-11-28T00:19:30+5:302018-11-28T00:19:48+5:30

उद्योग व्यवसायाच्या वृद्धीसाठी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात सौहार्दपूर्ण वातावरण अपेक्षित आहे. पैसे देऊन शांतता विकत घेता येत नाही तर जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बॉश कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे महाव्यवस्थापक मुकुंद भट यांनी केले.

 Harmony With Workers For Industry Growth | उद्योगवृद्धीसाठी कामगारांशी सौहार्द आवश्यक

उद्योगवृद्धीसाठी कामगारांशी सौहार्द आवश्यक

Next

सातपूर: उद्योग व्यवसायाच्या वृद्धीसाठी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात सौहार्दपूर्ण वातावरण अपेक्षित आहे. पैसे देऊन शांतता विकत घेता येत नाही तर जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बॉश कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे महाव्यवस्थापक मुकुंद भट यांनी केले.
निपमच्या वतीने ‘उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी मनुष्यबळ विकासाच्या सर्वोत्तम योजना’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. हॉटेल एक्स्प्रेस इन येथे चार सत्रात कार्यशाळा घेण्यात आली. प्रमुख वक्ते म्हणून व्यवस्थापन तज्ज्ञ रत्नाकर वेलिंग, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्राचे उपाध्यक्ष हिरामण आहेर, सॅमसोनाइट कंपनीचे वाय. एम. सिंग, व्यवस्थापन सल्लागार अ‍ॅड. उदय खरोटे, अ‍ॅड. सुहास जपे, अ‍ॅड. महेंद्र जानोरकर, अ‍ॅड. एस. एस. खैरनार, जीएसकेचे अनिल सहजे, विश्वनाथ डोंगरे, एपिरॉक कंपनीचे धर्मेश मेहता, एस. आर. कुंडाजे आदी तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. स्वागत प्रकाश बारी यांनी केले. सूत्रसंचालन महाराज बुंदेले यांनी केले. चंद्रन नंबियार, राजाराम कासार,अ‍ॅड. रमेश गवळी, प्रकाश बारी, अ‍ॅड. श्रीधर व्यवहारे, विनायक पाटील, कौस्तुभ शुक्ला, हेमंत राख, राजेंद्र रसाळ आदी उपस्थित होते.
चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणून दिलीप महाले, अशोक सोनवणे, जितेंद्र कामटीकर यांनी भूषविले. या चर्चासत्रात नाशिकमधील विविध कारखान्यांतील १२५ च्या वर मनुष्यबळ विकास अधिकारी सहभागी झाले होते. निपमचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात कार्यशाळेचे सविस्तर माहिती दिली.

Web Title:  Harmony With Workers For Industry Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.