हापूस आंब्याची अमेरिकेत निर्यात सुरू
By admin | Published: April 8, 2017 12:07 AM2017-04-08T00:07:39+5:302017-04-08T00:07:52+5:30
फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणचा हापूस आंब्याची निर्यात लासलगावमार्गे अमेरिकेला सुरू झाली आहे.
शेखर देसाई लासलगाव
फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणचा हापूस आंब्याची निर्यात लासलगावमार्गे अमेरिकेला सुरू झाली आहे. वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतातील हापूस आंब्याची अमेरिकावारी सुरू झाली आहे. लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून हापूस आंब्यावर विकिरण प्रक्रि या होऊन पहिला कंटेनर शुक्रवारी अमेरिकेला रवाना करण्यात आला.
फळमाशीच्या प्रादुर्भावाचे कारण देत युरोपीय महासंघाने भारतातून आयात होणाऱ्या हापूस आंब्यावर २०१३ साली बंदी घातल्याने, फाळांचा राजा असलेल्या हापूसचे आता काय होणार, ही चिंता होती; पण आता ही चिंता कायमस्वरूपी मिटली असून, गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंब्याची मोठ्या झपाट्याने हा आंबा आता अमेरिकेचा दिशेने कूच करू लागला आहे. पहिल्याच दिवशी साडेसात मेट्रिक टन हापूस आंबा रवाना झाला आहे.
अमेरिकेला पाठविण्यात येणाऱ्या हापूस आंब्यावर लासलगाव येथे विकिरण प्रक्रिया केली जाते. या हंगामातील पहिली विकिरण प्रक्रि या साडेसात मेट्रिक टन आंब्यांवर करण्यात आली. एकूण ७२५० बॉक्स हापूस आणि केशर आंबा हंगामाच्या सुरुवातीला विकिरण करून अमेरिकेला पाठविण्यात आले. अमेरिकेला जाणाऱ्या आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे.
येथील कृषक या पथदर्शक विकीरण प्रक्रिया प्रकल्पात अॅग्रोसर्जईरेडिएटर्स (इंडिया) प्रा. लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापक प्रणव पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव येथील कृषकचे व्यवस्थापन निवासी अधिकारी महेंद्र अवधानी व संजय आहेर हे काम पहात आहेत. अमेरिकेला पाठविण्यात येणाऱ्या हापूस आंब्यावर
लासलगाव येथे विकिरण प्रक्रिया केली जाते.