नाशिक शहरात हर्ष चोरडिया अव्वल

By admin | Published: June 24, 2017 01:04 AM2017-06-24T01:04:59+5:302017-06-24T01:05:14+5:30

नाशिक : वैद्यकीय प्रवेशासाठी नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट म्हणेजच नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, हर्ष चोरडिया या विद्यार्थ्याने ७२० पैकी ६०५ गुण मिळवून नाशिकमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

Harsh Choradia tops in Nashik city | नाशिक शहरात हर्ष चोरडिया अव्वल

नाशिक शहरात हर्ष चोरडिया अव्वल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वैद्यकीय प्रवेशासाठी नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट म्हणेजच नीट २०१७ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, हर्ष चोरडिया या विद्यार्थ्याने ७२० पैकी ६०५ गुण मिळवून नाशिकमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने निकाल जाहीर केला असून, विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.
शहरातील विविध महाविद्यालयांमधील सुमारे १९ परीक्षा केंद्रांवर एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी नाशिक विभागातून जवळपास १० हजार ५०० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यातील हर्ष चोरडिया या विद्यार्थ्याने ६०५ गुण मिळवित अव्वल स्थान पटकावले असून, नेहा झाजेरिया हिने ६०० गुण मिळवून यश संपादन केले आहे. सुचितसिंग वालिया या विद्यार्थ्याने ७२० पैकी ५७१ गुण मिळवून यश आॅल इंडिया १५ आरक्षणात ३ हजार ८६९ क्रमवारी मिळविली आहे, तर मुर्तझा रनाळवाला २१२ गुण, अक्षय शिरसाठ (५११), रश्मी जोशी (४९१), तेजल भावसार (४८३), आकांक्षा नाकील ४६४ व प्रतीक्षा मुटकूल (४६१) गुण मिळवून संपादन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने १२ जून रोजी नीट परीक्षेचा निकाल २६ जून २०१६ पर्यंत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार शुक्रवारी (दि.२३) निकाल घोषित करण्यात आला. देशभरात ७ मे रोजी नीट परीक्षा पार पडली होती. यंदा सुमारे १२ लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली. यापैकी १०.५ लाख विद्यार्थ्यांनी हिंदी किंवा इंग्लिशमध्ये परीक्षा दिली, तर उर्वरित सव्वा लाख विद्यार्थ्यांनी इतर आठ भाषांची निवड केली होती. यावर्षी नीट परीक्षा दहा भाषांमध्ये घेण्यात आली होती. नीट परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि बीडीएससाठी प्रवेश घेता येणार आहे.

Web Title: Harsh Choradia tops in Nashik city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.