पुनर्मुल्यांकनात हर्षलिनी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 05:53 PM2018-08-23T17:53:04+5:302018-08-23T17:53:22+5:30
येवला : मार्च २०१८ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेचा निकाल लागून अडीच महिने उलटले, दरम्यान पुनर्मुल्यांकनात दोन गुण वाढल्याने स्वामी मुक्तानंद विद्यालयाची हर्षलीनी बाळू पांढरे हिला ९८ टक्के गुण मिळाले आहेत.
येवला : मार्च २०१८ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेचा निकाल लागून अडीच महिने उलटले, दरम्यान पुनर्मुल्यांकनात दोन गुण वाढल्याने स्वामी मुक्तानंद विद्यालयाची हर्षलीनी बाळू पांढरे हिला ९८ टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे येवला तालुक्यात प्रथम येण्याचा मान तिला मिळाला आहे.
एस एस सी परीक्षेचा आॅनलाईन निकाल शुक्रवार ८ जून २०१८ ला जाहीर झाला होता. येवला तालुक्यात डी. पॉल इंग्रजी माध्यमाची अदिती शेंद्रे ९७.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम तर स्वामी मुक्तानंद विद्यालयाची हर्षलीनी बाळू पांढरे हिने ९७.६० टक्के गुण मिळवून येवला तालुक्यात द्वितीय आल्याचे जाहीर झाले होते. दरम्यान आपणच प्रथम क्रमांक मिळवणार असल्याचा आत्मविश्वास हर्षलिनीने व्यक्त करीत, संस्कृत व समाजशास्त्र या विषयाचे पुनर्मुल्यांकनासाठी एसएससी बोर्डात प्रस्ताव दाखल केला होता. या दोन्ही विषयात प्रत्येकी एक असे एकूण दोन गुण वाढल्याने तिच्या एकूण गुणांची बेरीज ४९० झाली. त्यामुळे ९८ टक्के गुण मिळवित ती प्रथम आली आहे. संस्कृतमध्ये एका गुणाची वाढ झाल्याने १०० पैकी १०० गुण तर समाजशास्त्रात ९४ ऐवजी ९५ गुण झाले आहेत.
तिचे आई आणि वडील दोघेही प्राध्यापक आहेत. गुणामध्ये झालेल्या बदलाचे नासिक विभागीय मंडळ सचिव यांच्या स्वाक्षरीचे पत्र हर्षलिनीला मिळाले आहे.