हरसूल बंद...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 11:03 PM2020-06-24T23:03:22+5:302020-06-24T23:03:49+5:30
त्र्यंबकेश्वर : आतापर्यंत निरंक असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. हरसूल येथील ५५ वर्षीय वक्ती बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्याचे नाशिक येथे जाणे-येणे होते. त्यामुळे त्यास बाधा झाल्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देघरीच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
त्र्यंबकेश्वर : आतापर्यंत निरंक असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. हरसूल येथील ५५ वर्षीय वक्ती बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्याचे नाशिक येथे जाणे-येणे होते. त्यामुळे त्यास बाधा झाल्याची शक्यता आहे. तर त्याच्या सहवासातील चार नातेवाइकांना क्वॉरण्टाइन केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश मोरे व सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले व तहसीलदार दीपक गिरासे यांनी दिली आहे. तसेच त्र्यंबकेश्वर शहरातील व तालुक्यातील जनतेने घाबरून न जाता स्वत:ची काळजी घ्यावी. घरीच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.