हरसूल मॅरेथॉन-२०१८ : एक हजार आदिवासी शालेय विद्यार्थ्यांची धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 06:20 PM2018-02-10T18:20:04+5:302018-02-10T18:23:36+5:30

या मॅरेथॉनमध्ये सुमारे हरसूल परिसरातील एक हजार आदिवासी शालेय विद्यार्थ्यांनी धाव घेतली. ग्रामिण पोलीस दलाचे अधिक्षक अधिक्षक संजय दराडे यांच्या हस्ते शनिवारी (दि.१०) सकाळी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला.

Harsul Marathon -2018: One thousand tribal school students run | हरसूल मॅरेथॉन-२०१८ : एक हजार आदिवासी शालेय विद्यार्थ्यांची धाव

हरसूल मॅरेथॉन-२०१८ : एक हजार आदिवासी शालेय विद्यार्थ्यांची धाव

Next
ठळक मुद्देमहिला सुरक्षा व सामाजिक सलोख्यासाठी आदिवासींमध्ये जनजागृती पोलीस अधिक्षक अधिक्षक संजय दराडे यांच्या हस्ते मॅरेथॉनला हिरवा झेंडा वाघेरा आश्रमशाळेची अंकिता बांगाड ही विद्यार्थिनी प्रथम

नाशिक : सामाजिक सुरक्षा व जातीय सलोखा वृध्दिंगत व्हावा, जेणेकरुन कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, या उद्देशाने ग्रामिण पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हरसूल मॅरेथॉन-२०१८’मध्ये अंकिता बांगाड ही वाघेरा आश्रमशाळेची विद्यार्थिनी प्रथम आली. या मॅरेथॉनमध्ये सुमारे हरसूल परिसरातील एक हजार आदिवासी शालेय विद्यार्थ्यांनी धाव घेतली.
ग्रामिण पोलीस दलाचे अधिक्षक अधिक्षक संजय दराडे यांच्या हस्ते शनिवारी (दि.१०) सकाळी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला. यावेळी धावपटू कविता राऊत राऊत फाउण्डेशनचे मुख्यधिकारी महेश तुंगार यांच्या हस्ते झाले. सकाळी सात वाजेपासून मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला. शाळकरी मुलींसाठी तीन किमीचा गट होता. तर मुख्य स्पर्धेनंतर पोलिस अधिकारी,कर्मचारी, नागरीकांवह विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे आनंदी दौड लगावली. मॅरेथॉन स्पर्धेसाठी अप्पर पोलिस अधिक्षक विशाल गायकवाड, प्रभारी अधिक्षक ओमक्का सुदर्शन, हरसूलचे प्रभारी पोलिस अधिकारी प्रविण साळुंखे, तहसिलदार महेंद्र पवार, पंचायत समिती उपसभापती रवींद्र भोये, रोहिणी दराडे, आदींसह उपस्थीत होते.


आदिवासी दुर्गम भागातील आश्रमशाळांसह जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. तसेच महिला सुरक्षा व सामाजिक सलोख्यासाठी आदिवासींमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या निमित्ताने आदिवासी विद्यार्थ्यांमधील धावपटूची चमक बघावयास मिळाली, असे मत दराडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
यास्पर्धेत वाघेरा आश्रम शाळेची अंकिता बांगाड प्रथम नाचलोंढी विद्यालयाची विद्या भांगरे द्वितीय तर वाघेरा आश्रम शाळेची विद्यार्थीनी रविना चौधरी हिने तृतीय क्र मांक पटकावला. रोहिणी खेडूलकर,राणी गालट, सुशिला चौधरी या विद्यार्थीनींना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Web Title: Harsul Marathon -2018: One thousand tribal school students run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.