हरसूल-नाशिक रस्त्याची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 06:50 PM2021-08-07T18:50:36+5:302021-08-07T18:51:24+5:30

त्र्यंबकेश्वर : हरसूल-नाशिक रस्त्याची झाली चाळण झाली आहे. नाशिक तसेच सापगाव, वाघेरा या दोन्ही महामार्गावर पडलेल्या खड्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सुस्त झोपला आहे. यामुळे नागरिकांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे.

Harsul-Nashik road was paved | हरसूल-नाशिक रस्त्याची झाली चाळण

हरसूल-नाशिक रस्त्याची झाली चाळण

Next
ठळक मुद्दे त्र्यंबकेश्वर : रस्ता गेला खड्ड्यात ; वाहनचालक झाले त्रस्त !

त्र्यंबकेश्वर : हरसूल-नाशिक रस्त्याची झाली चाळण झाली आहे. नाशिक तसेच सापगाव, वाघेरा या दोन्ही महामार्गावर पडलेल्या खड्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सुस्त झोपला आहे. यामुळे नागरिकांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे.

पहिल्याच जोरदार पावसात महामार्गाची दयनीय दुरवस्था झाल्याने महामार्ग खड्डेमय बनला असून अपघातांना आमंत्रण देत आहे. याशिवाय ज्यांना कंबरदुखी, स्नायूंचे दुखणे, मणक्यांचे विकार होत आहेत, तर काही रुग्णांचे आजार वाढत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसात केलेली तात्पुरती मलमपट्टीचा पहिल्याच पावसात निघून गेल्याने रस्त्यांचा बट्ट्याबोळ झाला आहे.

हरसूल - नाशिक महामार्गावरील कोणे ते वाघेरा महामार्गावर खड्डेच खड्डे पडले असून रस्ताचा खड्डेमय बनला आहे. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, वाहनधारकांना वाहन चालवतांना डोकेदुखी झाली आहे. तर प्रवाशांना शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. 
यामुळे खड्डे चुकवितांना अनेक लहान मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळत आहे. या भागातील संपुर्ण महामार्गात खड्डे दिसून येत असल्याने महामार्गावर लहान-मोठ्या खड्ड्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. यामुळे महामार्ग असून अडचण नसून खोळंबा अशी अशी प्रवाशांची गत झाली आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवत वाहन चालवतांना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या खड्ड्यांमुळे वाहन बिघडण्याचे, वाहनाचे पार्ट खिळखिळे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. महत्वाचा आणि हरसूल सारख्या दळणवळणाच्या दृष्टीने ग्रामीण भागात व गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात नाळ जोडणाऱ्या हरसूल - नाशिक महामार्गाची एकमेव झालेली दुरवस्था लाजिरवाणी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी याच भागात केलेली डागडुजी केव्हाच गायब झालीअसून महामार्ग गावरान रस्ता बनला असल्याचे चित्र दिसत आहे.

यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या महात्वाच्या रस्त्याकडे त्वरीत लक्ष देवून चांगल्या प्रकारे दुरुस्त करुन घ्यावा असे परीसरातील नागरीक व त्रस्त वाहन चालक करीत आहे.

हरसूल - नाशिक महामार्गावरील कोणे ते वाघेरा जेमतेम ३ कि.मी. अंतरावर खड्डेच खड्डे पडले आहे. यामुळे महामार्ग खड्याचा बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी सूचित करण्यात येऊन ही परिस्थिती जैसे थे आहे. त्याच बरोबर वाघेरा घाट धोकादायक स्थितीत आहे. रस्त्यांची मलमपट्टी खपवून घेतली जाणार नाही, अन्यथा वेगळे पाऊल उचलावे लागेल.
- रुपांजली माळेकर, जि.प.सदस्य, हरसूल गट.

 

Web Title: Harsul-Nashik road was paved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.