अखंड सौभाग्यासाठी हरतालिक ा व्रत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:42 AM2017-08-25T00:42:41+5:302017-08-25T00:43:01+5:30
अखंड सौभाग्य लाभावे यासाठी महिलावर्गाकडून गुरुवारी (दि. २४) पारंपरिक पद्धतीने हरतालिकेचे पूजन करण्यात आले. भाद्रपद शुक्ल तृतीयेस साजºया करण्यात येणाºया या सोहळ्यास शहराच्या विविध भागांतील शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती.
नाशिक : अखंड सौभाग्य लाभावे यासाठी महिलावर्गाकडून गुरुवारी (दि. २४) पारंपरिक पद्धतीने हरतालिकेचे पूजन करण्यात आले. भाद्रपद शुक्ल तृतीयेस साजºया करण्यात येणाºया या सोहळ्यास शहराच्या विविध भागांतील शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती.
पुराणात उल्लेख केल्याप्रमाणे पार्वतीने श्ांकर आपल्याला पती म्हणून मिळावा यासाठी हे व्रत केले होते. याचप्रमाणे कुमारिका आपल्याला मनासारखा आणि चांगला जोडीदार मिळावा यासाठी, तर विवाहित महिलांनी मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा याकरिता हे व्रत केले.
श्रावणात केल्या जाणाºया मंगळागौरी पूजनाप्रमाणेच हरतालिकेची पूजा मांडण्यात आली. दोन हिरव्या बांगड्या, कंगवा, आरसा, कुंकू, करंडा या साहित्यांसह शंकराची प्रतिमा तसेच नदीतील वाळू आणून शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने हरतालिकेचे पूजन केल्यानंतर आरती आणि कहाणीचे वाचन करण्यात आले. सकाळपासूनच कपालेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर, नीलकंठेश्वर मंदिर, तीळ भांडेश्वर लेनमधील महादेव मंदिर यांसह विविध भागांतील शिव मंदिरांमध्ये महिलांनी गर्दी केली होती. एकादशीसारखा उपवास असणाºया या व्रतात आठ प्रहर उपवास केल्यानंतर आणि गुरुवारी मध्यरात्री जागरण करून तसेच शिवलिंगाला दही-भाताचा नैवेद्य अर्पण करून या व्रताची सांगता करण्यात आली.