मालेगावचे हारूण बी. ए. यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 05:41 PM2020-05-10T17:41:07+5:302020-05-10T17:41:24+5:30
मालेगाव येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड हारूण बी. ए. (९०) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मालेगाव नगरपालिकेत १५ वर्ष ते नगरसेवक म्हणून कार्यरत होते.
मालेगाव : येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड हारूण बी. ए. (९०) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मालेगाव नगरपालिकेत १५ वर्ष ते नगरसेवक म्हणून कार्यरत होते.
कॉम्रेड हारूण हे शहरातील पहिले बी. ए. झाल्याने हारूण बी. ए. हे नाव त्यांना मिळाले. त्याच नावाने ते नंतर ओळखले जात होते. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मालेगावी उभारण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यांनी या पक्षाचे ७ नगरसेवक निवडून आणले होते. त्यांनी न.पा. स्थायी समितीचे सभापती म्हणूनही काम पाहिले.धर्मनिरपेक्ष, समाजवादी चळवळ, कम्युनिस्ट ,परिवर्तन वादी चळवळीत काम करण्यात त्यांचा पुढाकार होता. भाकप नेते माधवराव गायकवाड, ए. बी. बर्धन, शमीम फैजी, निहाल अहमद, हरिभाऊ महाले यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, चार मुली असा परिवार आहे.