पेठ तालुक्यातील मशरूम उत्पादकाना येणार सुगीचे दिवस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 07:43 PM2020-10-08T19:43:06+5:302020-10-09T01:06:30+5:30

पेठ - आदिवासी भागातील पारंपारिक पिकांसोबत आधूनिक कृषी तंत्रज्ञानाच्या जोडीने पेठ तालुक्यातील जवळपास १०० शेतकऱ्यांनी एकत्र येत मशरूम उत्पादन सुरु केले असून भविष्यात मशरूम उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार असल्याचे दिसून येते.

Harvest days for mushroom growers in Peth taluka! | पेठ तालुक्यातील मशरूम उत्पादकाना येणार सुगीचे दिवस !

पेठ तालुक्यातील मशरूम उत्पादकाना येणार सुगीचे दिवस !

Next
ठळक मुद्देवनराज शेतकरी बचत गट : गावंधपाडा येथे शेतकरी कायर्शाळा

पेठ - आदिवासी भागातील पारंपारिक पिकांसोबत आधूनिक कृषी तंत्रज्ञानाच्या जोडीने पेठ तालुक्यातील जवळपास १०० शेतकऱ्यांनी एकत्र येत मशरूम उत्पादन सुरु केले असून भविष्यात मशरूम उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा प्रकल्प, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व आदिवासी विकास विभाग यांच्या सहकार्यातून गावंधपाडा येथील वनराज फॉर्मर्स प्रोड्यूसर च्या वतीने मशरूम उत्पादक शेतक?्यांसाठी एकदिवशीय कायर्शाळा संपन्न झाली. सहयाद्री फॉमर्चे संचालक विलास शिंदे यांनी शेतकºयांना मशरूम उत्पादन, प्रक्रिया व विक्री या विषयी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी कृषी विभागाच्या विकेल तेच पिकेल अंतर्गत शेतकºयांना विविध कृषी योजनांची माहिती दिली याप्रसंगी सहयाद्री फार्म चे संचालक विलास शिंदे,सुनील वानखेडे , पेठ तालुका कृषी अधिकारी, अरविंद पगारे , आंधळे,म्हसे, अचर्ना देशमुख, किरण पवार,चेतना पवार,तांबे ,शर्मा मोहन गावंडे,यशवंत गावंडे, तुषार बिरारी, पुंडलिक नाठे,यशवंत राऊत,कविता कुंभार, जगदीश सहारे, दामूजी राऊत, मनोहर सातपुते, काशिनाथ देशमुख आदी शेतकरी उपस्थित होते.

कृषी विभागाच्या विकेल तेच पिकेल अभियातर्गत गावंधपाडा येथे मशरूम उत्पादन व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले असून वनराजच्या माध्यमातून तालुक्यातील शेतक?्याना शेतीचे विविध प्रयोग , तंत्रज्ञानाचा वापर , शेतीपूरक व्यवसाय उत्पादन व विक्री बाबत मार्गदर्शन करण्यात येत असून मशरूम च्या उत्पादनात पेठ तालुक्याने आघाडी घेतली आहे.
- अरविंद पगारे,तालुका कृषी अधिकारी, पेठ

गावंधपाडा ता पेठ येथे मशरूम उत्पादक मेळाव्यात मार्गदर्शन करतांना विलास शिंदे समवेत अरविद पगारे, यशवंत गावंडे आदी. (०८पेठ१)

 

Web Title: Harvest days for mushroom growers in Peth taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.