हरणांच्या कळपाकडून पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 06:02 PM2019-01-08T18:02:58+5:302019-01-08T18:03:31+5:30

अडीच महिन्यांपासून येवला तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या यातना सहन करत असताना मानोरी बुद्रुक, खडकीमाळ आदी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिकांचे कमी उत्पादन घेतले आहे. दुसरीकडे हरणांचे कळप धुमाकूळ घालत पिकांची नासधुस करत आहे. गेल्या आठ दिवसांपासून वीस हरणांचा कळप मानोरी बुद्रुक परिसरातील शेतशिवारातील पिकांची नासाडी करत असल्याची माहिती शेतकºयांनी दिली आहे.

Harvesting of crops from deer's herd | हरणांच्या कळपाकडून पिकांची नासाडी

हरणांच्या कळपाकडून पिकांची नासाडी

googlenewsNext

मानोरी : अडीच महिन्यांपासून येवला तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या यातना सहन करत असताना मानोरी बुद्रुक, खडकीमाळ आदी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिकांचे कमी उत्पादन घेतले आहे. विहिरीतील आणि बोअरवेलमधील पाण्याची साठवण करून गहू, हरभरा, कांदा पिके जगविण्यासाठी धडपड असाताना दुसरीकडे हरणांचे कळप धुमाकूळ घालत पिकांची नासधुस करत आहे. गेल्या आठ दिवसांपासून वीस हरणांचा कळप मानोरी बुद्रुक परिसरातील शेतशिवारातील पिकांची नासाडी करत असल्याची माहिती शेतकºयांनी दिली आहे.
येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर भागात मोठ्या प्रमाणात हरणांचे वास्तव्य आहे. यातीलच अनेक हरणांचे कळप पाण्याच्या व अन्नाच्या शोधात भटकंती करत आहे. हे वीस हरणांचे कळपदेखील अन्न आणि पाण्याच्या शोधात मानोरी बुद्रुक परिसरात आले असल्याची चर्चा आहे. शेतातील हरभरा, तूर, गवत, हिरवा घास खाण्यासाठी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आपली पिके वाचवण्यासाठी काही शेतकरी शेताची राखण करत आहे. अशावेळी शेतात व्यक्तीला बघितल्यानंतर हरणांचा कळप धूम ठोकत शेतातील उभ्या पिकातून पळत सुटल्याने उभी पिके भुईसपाट होऊन नुकसान होत असल्याने शेतकरी धास्तावले आहे. दोन ते तीन दिवसांपासून शेतकरी या हरणांच्या कळपाला हुसकवण्याचा प्रयत्न करत असून, हरणांचे कळप दिवसाऐवजी रात्रीच्या वेळी शेतात धुडगूस घालत आहे. हिरवा घास हरिण खाऊन जात असल्याने घरच्या जनावरांच्या चाºयाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकरी चिंतित आहे. सहा ते सात कुत्र्यांची एक टोळी या हरणांच्या कळपाच्या मागावर असून, अनेकदा हरीण पकडण्याचा प्रयत्न कुत्र्यांनी केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी दोन वानर पाण्याच्या शोधात मानोरीत आले होते. या वानरांनी तब्बल बारा दिवस मानोरीत मुक्काम ठोकून आपली तहान भागवत होती. वनविभागाने हरणांच्या पिण्याच्या पाण्याची अन्नाची सोय करणे गरजेचेअसल्याच ेशेतकर्यांनी सांगितलेआहे.
 

Web Title: Harvesting of crops from deer's herd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.