गुळवंच येथे गारपीटीने डाळिंब बागाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 03:54 PM2019-04-20T15:54:15+5:302019-04-20T15:54:31+5:30
सिन्नर : सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीटीने येथील शारदा सोमनाथ ताडगे यांच्या शेतातील डाळींब बागाचे पूर्णपणे नुकसान झाले.
सिन्नर : सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीटीने येथील शारदा सोमनाथ ताडगे यांच्या शेतातील डाळींब बागाचे पूर्णपणे नुकसान झाले. ताडगे यांचा गुळवंच परिसरात गट क्र. ४६३/२ यातील साडेतीन एकर शेतात डाळिंब बाग आहे. दुष्काळात पाणी नसतानाही ताडगे यांनी टॅँकर विकत घेवून डाळिंबाच्या बागाला पाणी घालून पिक फुलवले होते. मात्र, सोमवारी सायंकाळी अचानक झालेल्या वादळी वाºयासह पावसाने व गारपीटीने ताडगे यांच्या शेतातील साडेतीन एकर डाळिंबाचे नुकसान झाले. डाळिंबाला आलेले फळ गळून पडले. तर झाडांची पानेही गळून गेली. त्यामुळे ताडगे यांचे सुमारे १५ ते २० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी अधिकारी खेडकर व तलाठी सूर्यवंशी यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी सरपंच विष्णू सानप, उपसरपंच परसराम कांगणे, भाऊसाहेब शिरसाठ, संपत ताडगे, सुरेश बोडके, अर्जुन कांगणे, सोमनाथ कांगणे आदींनी पाहणी केली.