पिकांवरील दवामुळे बळीराजा धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:01 AM2020-01-03T00:01:20+5:302020-01-03T00:01:48+5:30

गोरख घुसळे । पाटोदा : गेल्या दोन महिन्यांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे शेतकरी हतबल झालेला असतानाच परिसरात हवामानाने आपला लहरीपणा ...

Harvesting threatened the victim | पिकांवरील दवामुळे बळीराजा धास्तावला

पाटोदा येथे दाट धुके व दवाचा शेपूवर साचलेला थर.

Next
ठळक मुद्देगोदाकाठ परिसरात थंडीचा कडाका : रब्बी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची भीती

गोरख घुसळे ।
पाटोदा : गेल्या दोन महिन्यांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे शेतकरी हतबल झालेला असतानाच परिसरात हवामानाने आपला लहरीपणा नवीन वर्षातही कायम ठेवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दाट धुके व दव पडत असून, हे धुके दुपारपर्यंत कायम दिसत होते. या दव व धुक्यामुळे रब्बी हंगामातील कांदा, हरभरा व कांदा रोपांवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच तयार द्राक्षबागांवर डावणीचे प्रमाण वाढल्यामुळे कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून, पूर्णत: हतबल झाले आहे. सकाळी पडणाऱ्या या नयनरम्य धुक्यामुळे पिकांची वाट लागली असून, उत्पादनात घट येण्याची धास्ती निर्माण झाल्याने बळीराजा संकटात आला असून, त्याची चिंता वाढली आहे.
पाटोदा परिसरातील ठाणगाव, कानडी, विखरणी, कातरणी, पिंपरी, धुळगाव, साबरवाडी, खैरगव्हाण, सावरगाव, सोमठाण देश, निलखेडे, आंबेगाव, शिरसगाव लौकी, वळदगाव आदी परिसरात मोठ्या प्रमाणात धुके व दव पहावयास मिळाले. आज दुपारपर्यंत धुक्यामुळे जवळील काही अंतरावरदेखील दिसत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलामुळे शेतकरी पिकांवर महागडी औषधे फवारत आहेत, त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्याला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे, मात्र आता तो पूर्णपणे हतबल झाला असून, पिकांवर किती वेळा महागड्या औषधांची फवारणी करायची, असा सवाल करत आहे.

ढगाळ वातावरणामुळे पिके खराब झाल्याने उत्पादनात घट
यावर्षी अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, बाजरी, सोयाबीन, कांदा ही सर्व पिके पावसामुळे सडून गेल्याने खराब झाली. शेतकऱ्यांच्या हाती दमडीही आली नाही. खरिपासाठी केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला, असे असतानाही शेतकºयांनी खरीप हंगामाची लागवड केली.
४गेल्या दोन महिन्यापासून असलेले ढगाळ हवामान, पाऊस, दाट धुके व दवामुळे रब्बी हंगामातील, कांदा व कांदारोप, हरभरा व भाजीपाला पिके खराब झाल्याने उत्पादनात घट निर्माण होण्याची भीती शेतकरीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

पाटोदा आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड धुके पडत आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षाच्या कालावधीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात धुके व दव पडले आहे. या धुके व दवामुळे रब्बी हंगामातील पिके व द्राक्ष व डाळिंब बागा धोक्यात आल्या आहेत. द्राक्षबागेवर डावणी तसेच कांद्यावर करपा रोगाचे प्रमाण वाढले आहे. खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्यात जमा आहे.
- नंदकुमार मेंगाणे, शेतकरी, पाटोदा

धुके, दवामुळे कांदा सडला
४सध्या बाजारात कांद्यास चांगला भाव मिळत आहे. व अजूनही काही दिवस कांद्यास असेच बाजारभाव मिळण्याची शेतकºयांना खात्री आहे मात्र गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सकाळी पडणाºया या दव व धुक्यामुळे कांदा व कांदारोपांच्या पातीवर दव साचत असून, या दवाचा निचरा होऊन कांद्याच्या बुडाला पोहचत असल्याने कांदा हा जमिनीतच सडत आहे. परिसरातील हजारो हेक्टरवरील कांदा यामुळे खराब होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.

Web Title: Harvesting threatened the victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.