हरियाणाचा करण सिंग ‘मविप्र मॅरेथॉन’चा विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:28 AM2018-01-08T00:28:53+5:302018-01-08T00:31:55+5:30
नाशिक : ‘रन फॉर हेल्थ अॅण्ड बिल्ड द नेशन’ असा संदेश देणाºया ‘मविप्र मॅरेथॉन २०१८’ स्पर्धेचा किताब हरियाणाचा धावपटू करण सिंग याने जिंकला, तर महाराष्ट्राचा खेळाडू किशोर गव्हाणे याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यावर्षीचा विजेता करण सिंग याने निर्धारित ४२.१९ किमीचे अंतर २ तास २२ मिनिटे ३९ सेकंदात पूर्ण करत नव्या विक्रमाची नोंद केली.

धावपटूंचा उत्साह वाढविणाºया संगीताने रविवारी (दि. ७) पाचव्या राष्ट्रीय आणि दहाव्या राज्यस्तरीय ‘नाशिक मविप्र मॅरेथॉन’ स्पर्धेत देशभरातल्या विविध खेळाडूंनी सहभाग नोंदवला. करण सिंग याने या स्पर्धेत धावताना गतवर्षीचा हैदराबादचा विजेता संजय कैरा याचा विक्रम (२ तास २७ मिनिटे) मोडीत काढत नव्या विक्रमाची नोंद केली. रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात आॅलिम्पिक रोइंगपटू दत्तू भोकनळ याच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.