देवळ्यात ऑक्सिजन प्रकल्पाचे घाईघाईत लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 11:00 PM2021-10-09T23:00:11+5:302021-10-09T23:01:08+5:30

देवळा : तालुक्यातील उमराणा व देवळा येथील ग्रामीण रुग्णालयांसाठी मंजूर झालेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, मंत्रिमहोदयांचा अचानक दौरा लागून घाईघाईत लोकार्पण सोहळा पार पाडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Hasty public offering of oxygen project at the temple | देवळ्यात ऑक्सिजन प्रकल्पाचे घाईघाईत लोकार्पण

ग्रामीण रुग्णालय देवळा येथे ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण करताना डॉ. भारती पवार. समवेत आमदार डॉ. राहुल आहेर, केदा आहेर आदी.

Next
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांची धावपळ : रुग्णालयात सुविधा उपलब्ध

देवळा : तालुक्यातील उमराणा व देवळा येथील ग्रामीण रुग्णालयांसाठी मंजूर झालेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, मंत्रिमहोदयांचा अचानक दौरा लागून घाईघाईत लोकार्पण सोहळा पार पाडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल आहेर होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर होते. यावेळी आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. पुना गांडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, तहसीलदार विजय सूर्यवंशी, कृषी अधिकारी सचिन देवरे, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश कांबळे, सहायक अधीक्षक विजयसिंग पवार, संभाजी आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात ऑक्सिजनचा तुटवडा पडल्यामुळे प्रशासनाबरोबरच रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांची ऑक्सिजन मिळविण्यासाठी दमछाक झाली. ऑक्सिजनची समस्या दूर करण्यासाठी तालुक्यातील काही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी पुढे येत कोविड केअर सेंटरला भेट दिलेल्या ऑक्सिजन मशीनमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले. येऊ घातलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देतांना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये या उद्देशाने देवळा व उमराणा येथे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत. यावेळी अतुल पवार, जितेंद्र आहेर, किशोर चव्हाण, महेंद्र पाटील आदींसह आरोग्य विभागाचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

अचानक दौऱ्यामुळे धावपळ
केंद्रीय मंत्र्यांचा दौरा अचानक जाहीर झाल्यामुळे ग्रामीण रुग्णालय कर्मचाऱ्यांची कार्यक्रम आयोजित करण्यासाठी चांगलीच धावपळ झाली. जनतेच्या आरोग्याशी निगडित असलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनाची फारशी कोठे वाच्यता न झाल्यामुळे जनतेत नाराजी व्यक्त केली जात आहे. रुग्णालयात ३० ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. हवेतून ऑक्सिजन जमा करणाऱ्या या प्रकल्पात २०० लीटर प्रति मिनीट ऑक्सिजन निर्मिती होणार असून दररोज ५० ते ६० जम्बो सिलिंडर भरतील इतका ऑक्सिजन एका प्रकल्पातून मिळणार आहे. प्रकल्पासाठी ५२ केव्ही क्षमतेचे रोहित्र उभारण्यात आले आहे.


ऑक्सिजन प्रकल्प सुरू झाल्यामुळे तालुक्यातील रुग्णांची गरज पूर्ण होऊन तालुका ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण झाला आहे. रुग्णांच्या नातेवाइकांचा ऑक्सिजनची शोधाशोध करण्यात वाया जाणारा वेळ वाचून रुग्णांना वेळेवर उपचार देणे शक्य होणार आहे.
- डॉ. राहुल आहेर, आमदार

 

Web Title: Hasty public offering of oxygen project at the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.