घृणास्पद : शरीरसंबध नाकारणाऱ्या पिडितेच्या मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 02:44 PM2019-07-28T14:44:48+5:302019-07-28T14:50:15+5:30
नाशिक शहरात वडाळा गावातील एका पिडीत महिलेने शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या आरोपींना शरीसंबध नाकारल्याने संशयितांनी तिचा विनयभंग करण्यासोबतच शरीर शारीरक सुखाला नाकार देणाख्या महिलेच्या मुलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणज फिर्यादीने या प्रकणार पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार करूनही पोलिसांकडून या प्रकरणी टाळाटाळ झाल्याचा आरोपही पिडितेने केला असून याप्रकरणी अकरा संशयित आरोपीविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : वडाळा गावातील एका पिडीत महिलेने शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या आरोपींना शरीसंबध नाकारल्याने संशयितांनी तिचा विनयभंग करण्यासोबतच शरीर शारीरक सुखाला नाकार देणाख्या महिलेच्या मुलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणज फिर्यादीने या प्रकणार पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार करूनही पोलिसांकडून या प्रकरणी टाळाटाळ झाल्याचा आरोपही पिडितेने केला असून याप्रकरणी अकरा संशयित आरोपीविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिला तिच्या कुटुंबियासह वडाळा गावात वास्तव्य करीत आहे. सदर पीडित महिलेस सुमारे आठ वषार्पासून संशयित आरोपी धनुष निकम (३३) हा वाईट नजरेने पाहून लज्जा उत्पन्न होईल असे इशारा करीत होता. अनेकदा त्याने पिडितेकडे शारिरीक सुखाची मागणीही केली. त्याला विरोध केला असता त्यांने महिलेच्या गळ्याला चाकु लावुन मुलांना मारण्याची धमकी दिली होती. देणे असे प्रकार वारंवार घडत असतानाच गुरुवारी (दि.१८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी धनुष निकम (३३), मुकेश कांबळे (१९) व पांड्या गायकवाड (४०) असे दोघे पीडित महिलेच्या घरात घुसून शारीरिक व मानसिक छळ करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच पीडित महिलेस घराबाहेर ओढले असता तिने आरडाओरड केली तिने विरोध केल्याचा राग येऊन तिच्या मुलास दोघा संशयित आरोपींनी पाण्याच्या टाकी जवळ लोखंडी सळईने मारहाण करीत गंभीर दुखापत करुण जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत पिडिचेच्या मुलाला कंबरेला व डाव्या खुब्याला गंभीर दुखापत झाली आहे.त्यामुळे पिडितेने धनुष निकम, मुकेश कांबळे, पांडया गायकवाड, सुरेश ,मोसिन , शिवा कांबळे ,लक्ष्मी निकम ,कविता निकम ,ज्योती निकम ,विजय उजगळे, असे अकरा संशयित आरोपींविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद विनयभंग व मुलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.सहायक पोलीस उपनिरीक्षक या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.
पोलिसांकड़ून टाळाटाळ
शारिरीक सुखास नकार देणाऱ्या पिडितेच्या मुलाला मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात पिडित महिलेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांकडजून वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे कारण सांगून टाळाटाळ झाल्याचा आरोप पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीच्या माध्यमातून केला आहे.