नाशिक पूर्व विभागातील १२ धार्मिक स्थळांवर हातोडा

By admin | Published: November 12, 2016 12:54 AM2016-11-12T00:54:32+5:302016-11-12T00:53:35+5:30

मनपाची कारवाई : किरकोळ वादाचे प्रसंग

Hathoda on 12 religious places in Nashik East Division | नाशिक पूर्व विभागातील १२ धार्मिक स्थळांवर हातोडा

नाशिक पूर्व विभागातील १२ धार्मिक स्थळांवर हातोडा

Next

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शुक्रवारी (दि. ११) आपला मोर्चा नाशिक पूर्व विभागातील जुने नाशिक, टाकळीरोड तसेच उपनगर भागातील अनधिकृत धार्मिक स्थळांकडे वळविला. दिवसभरात महापालिकेने १२ अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा चालविला. जुन्या नाशकात चव्हाटा परिसरासह एक-दोन ठिकाणी किरकोळ वादाचे प्रसंग घडले परंतु नंतर शांततेत कारवाई पार पडली.
महापालिकेने सकाळी नाशिक पूर्व विभागातील अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी कारवाईला सुरुवात केली. दिवसभरात नाशिक पुणे रस्त्यावरील बजरंगवाडी, टाकळी येथील दीपनगर, टाकळरोडवरील शांतीपार्क, उपनगर येथील इच्छामणी क्लिनिकजवळ, टाकळीरोड, शंकरनगर फॅनिंगजवळ, द्वारकावरील हॉटेल कावेरीमागे, जुन्या नाशकातील चव्हाटा, संभाजी चौक, डिंगरआळी अभ्यासिकेजवळील अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकाम हटविण्यात आले. चव्हाटा परिसरात काही लोकांनी धार्मिक स्थळ पाडण्यास हरकत घेत मुदत वाढवून मागितली परंतु महापालिकेने कारवाई होणारच असल्याचे सांगत आपली प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे किरकोळ वादाचे प्रसंग घडले. त्यानंतर मात्र, महापालिकेने इतरत्र शांततेत मोहीम पूर्ण केली. नाशिक-पुणे रस्त्यावरील बजरंगवाडी येथील अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम संबंधितांनी स्वत:हून काढून घेतले. सदर मोहीम अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्या नेतृत्वाखाली सहाही विभागीय अधिकारी तसेच पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आली. यावेळी दोन जेसीबी, तीन वाहने तैनात ठेवण्यात आली होती. महापालिकेने मंगळवारपासून मोहीम सुरू केली असून, चार दिवसात ८४ पैकी ३७ अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Hathoda on 12 religious places in Nashik East Division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.